बळीराजाला २५ कोटींच्या पीककर्जाचा आधार...तालुक्‍यात कर्जवाटपाला गती

kharip
kharip

नाशिक/ येवला : अवकाळी पाऊस, गारपीठ, त्यानंतर आलेला कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे बळीराजाचे आर्थिक कंबरडे मोडले. मात्र जून महिन्यात वेळेवरच पाऊसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामात चांगले उत्पादन घेण्यासाठी बळीराजा सज्ज झाला आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची मोठी गरज आहे. त्यानुषंगाने सहकार विभागाने सुलभ पीक कर्ज अभियान हाती घेतल्याने येवला तालुक्‍यात आत्तापर्यंत 1 हजार 774 शेतकऱ्यांना 25 कोटी 62 लाखाचे कर्ज वाटप झाले आहे. जिल्हा बॅंक अडचणीत असल्याने आता राष्ट्रीयकृत व खाजगी बॅंकांचाच मोठा आधार शेतकऱ्यांना मिळाला आहे. यामुळे खरीप पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत.

तालुक्‍यात कर्जवाटपाला गती
खरीप पीककर्ज वाटपाबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपविभागीय अधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारुळे, एकनाथ पाटील यांनी जिल्हा बॅंक व राष्ट्रीयकृत बॅंकांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत. कर्जवाटपाचा इंष्टांक पूर्ण करत कोणताही पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे तालुक्‍यात कर्जवाटपाला गती मिळत आहे.

असे झाले कर्जवाटप

तालुक्‍यात हजार ते बाराशे कोटींचे कर्ज वाटणाऱ्या जिल्हा बॅंकेचे अर्थकारण थकल्याने यंदा जिल्हा बॅंकेच्या दहा शाखांमधून 826 शेतकऱ्यांना आठ कोटी 69 लाख, बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या 4 शाखांमधून सर्वाधिक 391 शेतकऱ्यांना सात कोटी आठ लाख, स्टेट बॅंकेकडून 51 शेतकऱ्यांना 80 लाख, बॅंक ऑफ बडोदाच्या चार शाखांतून 342 शेतकऱ्यांना 6 कोटी 73 लाख, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतर्फे 9 शेतकऱ्यांना 11 लाख, बॅंक ऑफ इंडियाने 41 शेतकऱ्यांना 45 लाख, एचडीएफसीने 29 शेतकऱ्यांना 35 लाखाचे, आयसीसीआय बॅंकेने पाच शेतकऱ्यांना 12 लाख तर देना बॅंकेने 80 शेतकऱ्यांना 1 कोटी 26 लाख रूपयाचे कर्ज वाटप केले आहे.

असे झाले कर्जवाटप..
सप्टेंबर 2019 अखेर जिल्हा बॅंकेच्या 10 शाखातून 1 हजार 38 शेतकऱ्यांना 10 कोटी 49 लाखांचे तर व्यापारी व ग्रामीण बॅंकांच्या 13 शाखातुन 1 हजार 860 शेतकऱ्यांना 34 कोटी 28 लाखांचे कर्जवाटप झाले होते. 2020 जून अखेर जिल्हा बॅंकेच्या 10 शाखातून 826 शेतकऱ्यांना 8 कोटी 69 लाखांचे तर व्यापारी व ग्रामीण बॅंकांच्या 14 शाखातून 1 हजार 948 शेतकऱ्यांना 16 कोटी 92 लाखांचे कर्जवाटप झाले आहे.

तांत्रिक अडचणीत अडकले शेतकरी...
तालुक्‍यात जिल्हा बॅंक व खाजगी बॅंकांतून सुमारे 30 हजार शेतकरी कर्ज घेऊ शकतात. मात्र यातील सुमारे 17 ते 18 हजार शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अद्याप थकबाकीदार आहे. त्यामुळे ते नवे कर्ज घेण्यास पात्र नाही. शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातूनच कर्ज हवे असल्याने व सध्या जिल्हा बॅंक थकल्याने अनेक शेतकरी खाजगी बॅंकांच्या कर्जाला नको म्हणत वेळ मारून नेत असल्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 4 हजाराच्या आसपास मर्यादित असल्याचे बॅंक अधिकारी सांगतात.

हेही वाचा >प्रेरणादायी..! पत्नी खंबीर.. बेरोजगार व्यावसायिक पतीला दिली अशी साथ...संसाराचा केला स्वर्ग!​

" शेतकऱ्यांना सुलभ कर्ज वाटपासाठी अभियानाचा आराखडा तयार करण्यात आला असून 26 जूनपासून ते 10 जुलै कालाधीत जिल्हा बॅंकेच्या तालुक्‍यातील एकूण 12 शाखेत तसेच राष्ट्रीयकृत बॅंकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये अभियान राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पिक कर्ज उपलब्ध करण्याच्या सूचना सर्व बॅंकांना दिल्या असून पाठपुरावा सुरू आहे.- सोपान कासार, प्रांताधिकारी, येवला

हेही वाचा > संतापजनक! "...तर गौरव आज आमच्यात असला असता.."आरोप करत नातेवाईकांनी फोडला हंबरडा..आरोग्य केंद्राची तोडफोड

व्यापारी व ग्रामीण बॅंकांना शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही या सूचना केल्याचा परिणाम दिसत असून ज्यांना गरज आहे त्यांना कर्ज दिले जात आहे. यावर्षीही जूनमध्येच 25 कोटी वितरीत झाले आहे.- एकनाथ पाटील,सहाय्यक निबंधक, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com