थकबाकी मिळाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! 

विनोद बेदरकर
Saturday, 14 November 2020

 जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे मार्चपासून वेतन थकीत होते. सप्टेंबरपासून ते झालेले नव्हते. त्यामुळे असंतोष असलेल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला थकीत वेतन मिळाल्याने त्यांची दिवाळी गोड होणार आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे मार्चपासून वेतन थकीत होते. सप्टेंबरपासून ते झालेले नव्हते. त्यामुळे असंतोष असलेल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला थकीत वेतन मिळाल्याने त्यांची दिवाळी गोड होणार आहे. आज आरोग्य कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन मिळाल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांचे आभार मानले. 

थकीत वेतन मिळाल्याने त्यांची दिवाळी गोड
आरोग्य कर्मचाऱ्यांचे तत्काळ वेतन मिळाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय सोपे, राज्य सचिव बाळासाहेब कोठुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांचा सत्कार केला. वेतन दिले आता कित्येक वर्षांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नत्या रखडलेल्यांना मंजुरी द्यावी. तसेच आरोग्य सहाय्यक व आरोग्य विस्ताराधिकारी यांना पदोन्नती देताना राहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नतीचे साकडे घातले. जानेवारीपासून २९ कर्मचारी निवृत्त झाले असून, निवृत्तिवेतनाचा विषय प्रलंबित असल्याचे सांगितले. बाळासाहेब चौधरी, एकनाथ वाणी, अनिल राठी, सूरज हरगोडे, डॉ. माधव अहिरे आदी उपस्थित होते.  

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali sweet for medical workers due to arrears nashik marathi news