"कोरोनासंबंधी अंध अफवाना बळी पडू नका..!" विविध अंधश्रद्धाचे फुटले पेव...

corona andhshraddha.jpg
corona andhshraddha.jpg

नाशिक : कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर विविध अंधश्रद्धा चे पेव फुटले आहे त्यामुळे अंधश्रद्धा लागण होणार नाही याची काळजी घ्यावी असे असवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे केले आहे.

अंधश्रद्धाचे आणि भीतीदायक मेसेज फोनद्वारे व्हायरल

तृतीय पंथीय बांधवाचा मृत्यु झाला, म्हणून कोरोनाचा प्रकोप झाला, हा प्रकोप थांबण्यासाठी लिंबाच्या वृक्षा खाली कणकेचा दिवा लावावा, कुठेतरी नवजात अभ्रक जन्माला आले ,ह्या बालकांमध्ये जन्मताच काही विकृती होती. ते झोपी जाताना म्हणाले की, जो जागा राहील तो जगेल आणि जो झोपेल तो कायमचा झोपेल. असे अंधश्रद्धाचे आणि भीतीदायक मेसेज फोनद्वारे पसरविले जात असल्याचे समजते. 

समाजमनात भीती निर्माण

त्यामुळे काही गावांमधून, काही महिला अगदी एक महिन्याच्या बालकालाही रात्रभर कडेवर घेऊन जाग्या राहिल्या ,भीतीपोटी अशा लहान मुलांनाही त्यांनी झोपू दिले नाही. ह्या आणि अशा प्रकारच्या अंधश्रद्धा युक्त अफवा काही लोक, या मागील कोणत्या प्रकारची शहानिशा न करता ,कार्यकारणभाव लक्षात न घेता,परस्परांना फोनाफोनी करून मोठ्या प्रमाणात पसरवित आहेत .विशेषता ग्रामीण आणि आदिवासी भागातही अशा अफवांचे पीक वाढत चालल्याचे समजते.पुढील काळातही, अजून वेगवेगळ्या अंधश्रद्धायुक्त अफवा आणि त्यातून समाजमनात भीती निर्माण होण्याची शक्यता आहे.

शासनाची कळकळीची विनंती..
वास्तविक,दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा सामाजिक आरोग्यास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता वाढत आहे.त्या पार्श्वभूमीवर आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अगदी कळकळीने लोकांना घरातच थांबण्यास सांगत आहे. खरंतर या सर्वांच्या मनातील आपल्याबद्दलची चिंता, कळकळ आपण सर्वांनी लक्षात घेऊन ,प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे ,स्वताचे रक्षण करणे आणि इतरांनाही काळजी घेण्यास सांगणे आवश्यक आहे .त्यासाठी फोनाफोनी केली तर समाजाचे मनोबल वाढण्यास मदत होईल.

पोलीसांना कळवावे...तरंच हे अनिष्ट प्रकार थांबतील. 

कोरोना विषाणूंचा प्रकोप लवकर आटोक्यात आला नाही आणि अशा अंधश्रद्धायुक्त आणि भीतीयुक्त अफवा पसरत राहिल्या तर या अनामिक भीतीमुळे, समाज, मानसिक स्वास्थ्य हरवून बसेल. पुढील काळातील संभाव्य संकटांना तोंड देण्यासाठी आवश्यक असणारे सामाजिक तसेच वैयक्तिक मनोधैर्य कमकुवत होईल.त्यातून आणखी नवीन सामाजिक समस्या निर्माण होतील .म्हणून कोरोनाबाबतच्या अंधश्रद्धायक्त प्रसंग,घटना आणि त्यावर करायचे काही दैवी उपाय ,कर्मकांड ,तोडगे याबाबत कुणाचाही मेसेज फोन आला तरी,घाबरून जाऊ नये, त्याकडे साफ दुर्लक्ष करावे .अशी चुकीची माहिती पुढे पाठवू नये .उलट यामागील फोलपणा, खोटारडेपणा स्पष्ट करावा. समोरच्या व्यक्तीला अशी चुकीची माहिती कळवित असल्याबाबत, तत्काळ पोलिसांना माहिती कळवित असल्याचे सांगावे.आणि खरोखर लगेच पोलीसांना कळवावे.तरंच हे अनिष्ट प्रकार थांबतील. 

अफवांना बळी पडू नये
आपण स्वतःही अशा अफवांना बळी पडू नये आणि इतरांनाही बळी पडण्यापासून वाचवावे. - डॉ.ठकसेन गोराणे,(राज्य सरचिटणीस,महाराष्ट्र अंनिस) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com