पोल्ट्री व्यवसायाला जिल्हा पोलिस अधीक्षक आरती सिंह यांचा दिलासा...लॉकडाऊनमध्येही मिळणार चिकन अन् अंडी!

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 24 March 2020

दुकाने उघडी राहतील, असे स्पष्ट केले. सरकारने संचारबंदीबाबत दिलेल्या आदेशात अंडी आणि चिकनचा अत्यावश्‍यक मालात समावेश केलाय. सीमा सीलमधून वाहतुकीला सवलत देण्यात आली. मात्र खाद्य, औषधे पोल्ट्री शेडपर्यंत पोचत नव्हती. ही बाब डॉ. सिंह यांनी गांभीर्याने घेतली आणि बिनतारी संदेशयंत्रणेद्वारे त्यांनी सूचना दिल्याने ब्रॉयलर कोंबड्या जगविणे शेतकऱ्यांना शक्‍य झाले, असे अहिरे यांनी म्हटले आहे. वाहनांच्या काचेवर पोल्ट्री खाद्य असे पोस्टर लावण्यात येणार आहे. 

नाशिक : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली. पोल्ट्री शेडपर्यंत खाद्य, औषधे पोचणे कठीण झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी हा प्रश्‍न मार्गी लावला, अशी माहिती पोल्ट्री फार्मर्स व ब्रीडर असोसिएशनचे सचिव उद्धव अहिरे यांनी दिला

 पोल्ट्री व्यवसायाला डॉ. आरती सिंह यांचा दिलासा 

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चिकन आणि अंडी दुकाने उघडी राहतील, असे स्पष्ट केले. सरकारने संचारबंदीबाबत दिलेल्या आदेशात अंडी आणि चिकनचा अत्यावश्‍यक मालात समावेश केलाय. सीमा सीलमधून वाहतुकीला सवलत देण्यात आली. मात्र खाद्य, औषधे पोल्ट्री शेडपर्यंत पोचत नव्हती. ही बाब डॉ. सिंह यांनी गांभीर्याने घेतली आणि बिनतारी संदेशयंत्रणेद्वारे त्यांनी सूचना दिल्याने ब्रॉयलर कोंबड्या जगविणे शेतकऱ्यांना शक्‍य झाले, असे अहिरे यांनी म्हटले आहे. वाहनांच्या काचेवर पोल्ट्री खाद्य असे पोस्टर लावण्यात येणार आहे. 

पोलिस आयुक्तांना विनंती
मुंबईकडे ब्रॉयलर कोंबड्या नेणाऱ्या आणि पुन्हा परत शेडकडे जाणाऱ्या वाहनांना नाशिकमधील द्वारका आणि घोटी हे जंक्‍शन पॉइंट आहेत. बुधवारी (ता. 25) चिकन दुकाने सुरू होतील, त्यांच्यासाठी कोंबड्या पाठविणाऱ्या वाहनांचा प्रवास थांबू नये, अशी विनंती पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांची भेट घेऊन करण्यात येणार असल्याचे अहिरे यांनी सांगितले. 

दीड कोटी कोंबड्या शेडमध्ये 
जिल्ह्यातील 15 हजार शेडमध्ये एक दिवसाच्या पिल्लापासून दीड महिन्यापर्यंत दीड कोटी कोंबड्या आहेत. मुंबईसाठी रोजचा दीड हजार टन कोंबड्या पाठविणे आवश्‍यक असल्याने वाहनांच्या अडचणींमुळे 35 टक्के मागणी पूर्ण करता येत आहे. 

दीड हजार कोटींचा फटका 
कोरोनाविषयक अफवेमुळे मंदी कोसळल्याने राज्यातील ब्रॉयलर कोंबड्या उत्पादकांना अकराशे आणि मका व सोयाबीन शेतकऱ्यांना चारशे असा एकूण दीड हजार कोटींचा दणका सव्वा महिन्यात बसला. सद्यःस्थितीत राज्यातील एक लाख शेडमध्ये सहा कोटी ब्रॉयलर कोंबड्या आहेत. 

#COVID19 : जिल्हाधिकारींच्या नावाने फेक संदेश व्हायरल; सायबर सेलकडे तक्रार दाखल
ब्रॉयलर कोंबड्या उत्पादकांच्या बाजूने "सकाळ' नेहमी उभा राहिला. बर्ड फ्लूमध्ये मदत केली. आता खाद्य आणि औषधांच्या वाहतूक विषयात मदत झाली. -उद्धव अहिरे, सचिव, पोल्ट्री फार्मर्स व ब्रीडर असोसिएशने  

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Aarti singh makes Comfort for the poultry business Nashik Marathi News