esakal | कधी संपणार 'या' वाड्यांची शोकांतिका?...अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव

बोलून बातमी शोधा

ghoti.jpg

चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेल्या पालघर-नाशिक सीमारेषेवर चिंचले खैरेच्या वीजप्रश्‍नाबाबत "सकाळ'च्या पाठपुराव्यानंतर मंजुरी मिळाली, मात्र आधी वन विभागाची परवानगी आणि आता लॉकडाउन यामुळे विजेच्या कामांची निविदा मुदत संपण्याची वेळ आली असून देखील अजून इथं पाणी अन् वीज नाही.

कधी संपणार 'या' वाड्यांची शोकांतिका?...अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक/घोटी : चिंचले खैरे (ता. इगतपुरी) ग्रामपंचायत हद्दीतील खैरे वस्तीत दोनशेहून अधिक आदिवासी कुटुंबे आहेत. चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेल्या पालघर-नाशिक सीमारेषेवर चिंचले खैरेच्या वीजप्रश्‍नाबाबत "सकाळ'च्या पाठपुराव्यानंतर मंजुरी मिळाली, मात्र आधी वन विभागाची परवानगी आणि आता लॉकडाउन यामुळे विजेच्या कामांची निविदा मुदत संपण्याची वेळ आलीय... 

वीजपुरवठा ई-टेंडर कार्यकाळ संपत आलाय...

दुर्गम आदिवासी भागातील खैरे वस्तीला अजूनही मूलभूत सुविधा नाहीत. रस्ता नसल्याने पावसाळ्यात महिनोन्‌महिने शहराशी संपर्क होत नाही, गरोदर महिला, रुग्ण यांना डोली करत आरोग्याच्या सेवेसाठी न्यावे लागते. "सकाळ'ने या भागातील नागरिकांच्या प्रश्‍नाला वाचा फोडल्यानंतर 2018 मध्ये वीजपुरवठा मंजूर झाला. मात्र वन विभागाच्या लाल फितीच्या कारभारामुळे आदिवासी ग्रामस्थांना जिल्हाधिकारी कार्यालयात दावा दाखल करावा लागला. लॉकडाउनमुळे दावा जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहे. वीजपुरवठा ई-टेंडर कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे आधी वन विभागाची दिरंगाई व आता लॉकडाउनमुळे पुन्हा या वस्तीला अंधारात राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी याप्रश्‍नी जिल्हाधिकारी कार्यालयाने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. 

हेही वाचा >  अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळामुळे शिक्षकाला चेकपोस्टवर लावली ड्युटी.. अन् चेकपोस्टवरच मोठा अपघात

खैरे वस्तीला वीजपुरवठा मंजूर झाला आहे, मात्र वन विभागाच्या कायदेशीर बाबींची पूर्तता लॉकडाउनमुळे रखडली आहे. ई-टेंडर कार्यकाळ पूर्ण होत असल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून खैरे येथील प्रश्‍न तडीस नेऊ. - हिरामण खोसकर, आमदार, इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर 

हेही वाचा > ''तिच्या आईवडिलांनी आमच्या लग्नाला परवानगी नाकरली.. म्हणूनच मी तिच्यासोबत.. ''..माथेफिरू युवकाची धक्कादायक जबानी