अभिमानास्पद! अमेरिकेत येवल्याच्या 'शेतकरीपुत्रा'चा वाजणार डंका; कामगिरीचं होतंय कौतुक

बापूसाहेब वाघ
Thursday, 1 October 2020

पुणे येथे सी.एस.आय.आर.नॅशनल केमिकल लॅब्रोटरीमध्ये बेसिक केमिकलवर रिसर्च केला जातो. येथेच डॉ. कदम यांनी पीएच.डी. पूर्ण केली. शिक्षण सुरू असताना औद्योगिक आणि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत शिष्यवृत्ती मिळाली होती. 

नाशिक : (मुखेड) नेऊरगाव (ता.येवला) येथील शेतकरीपुत्र डॉ. आप्पासाहेब कदम यांना अमेरिकेच्या मेडिसिन फॉर ऑल इन्स्टिट्यूट (एम ४ ऑल), व्हीसीयू, रिचमंड येथे पोस्ट डॉक्टोरस वैज्ञानिक म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली. 

सी.एस.आय.आर.नॅशनल केमिकल लॅब्रोटरीमध्ये बेसिक केमिकलवर रिसर्च

डॉ. आप्पासाहेब कदम यांनी पुणे येथे औषधनिर्माण क्षेत्रात पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर स्वाइन फ्लू, स्त्रियांच्या कर्करोग लस निर्मितीवर संशोधन पूर्ण केले असता केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल थेट अमेरिका येथील रिसर्च सेंटरद्वारे घेण्यात आली. पुणे रिसर्च सेंटर येथील अनुभवाच्या अनुषंगाने डॉ. आप्पासाहेब कदम यांना जगभरात असलेल्या कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणू तसेच एचआयव्ही औषध विकासावर अमेरिकेत संशोधन करतील. शेतकरीपुत्र डॉ. आप्पासाहेब कदम यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत स्वाइन फ्लू, स्त्रियांचा कर्करोग या आजारावर लस निर्मितीवर संशोधन पूर्ण करून औषधनिर्माण क्षेत्रात रसायनशास्त्रात पीएच.डी. पूर्ण केली. पुणे येथे सी.एस.आय.आर.नॅशनल केमिकल लॅब्रोटरीमध्ये बेसिक केमिकलवर रिसर्च केला जातो. येथेच डॉ. कदम यांनी पीएच.डी. पूर्ण केली. शिक्षण सुरू असताना औद्योगिक आणि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत शिष्यवृत्ती मिळाली होती. 

कोरोना विषाणू, एचआयव्ही औषध संशोधन करण्याची संधी 

प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत असताना पुढील संधी प्राप्त करण्यासाठी अमेरिकेच्या रिसर्च सेंटरकडे अर्ज केला असता अमेरिका रिसर्च सेंटरद्वारे दोन वेळा ऑनलाइन मुलाखत घेतली. पुणे येथून रिसर्च सेंटर मध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा घेत अभिप्राय घेतला. एचडी सेंटर येथेही संपर्क साधून माहिती घेत खात्री केली. डॉ. कदम यांना अमेरिका रिसर्च सेंटरला मुलाखत देण्याची संधी प्राप्त झाली. ऑनलाइन घेतलेल्या मुलाखतीनंतर एक वर्षासाठी अमेरिका येथील रिसर्च सेंटरला कोरोना विषाणू, एचआयव्ही औषध संशोधनाची संधी उपलब्ध करून दिली. १ नोव्हेंबर २०२० ला अमेरिका येथे उपस्थित राहणार आहे. झालेल्या निवडीनिमित्त नेऊरगाव येथे डॉ. आप्पासाहेब कदम यांचा मित्रमंडळींनी बुधवारी (ता. ३०) यथोचित सत्कार केला. प्रवीण कदम, प्रशांत कदम, शेखर कदम, समाधान कदम आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

अमेरिका रिसर्च सेंटर येथे संशोधनासाठी झालेली निवड सार्थ होईल, याची खात्री आहे. नवीन कार्य करण्यास यामुळे उभारी मिळणार आहे. - डॉ. आप्पासाहेब कदम 

हेही वाचा > विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Kadam was selected to the American Research Center nashik marathi news