esakal | विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

woman crying 1.jpg

मुलाच्या जन्म प्रमाणपत्राकरिता पतीला विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीला वेळोवेळी सांगितले. त्यानंतर विवाहितेला मानसिक व शारिरिक छळ करण्यात आला. काय घडले नेमके?

विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड :मुलाच्या जन्म प्रमाणपत्राकरिता पतीला विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीला वेळोवेळी सांगितले. त्यानंतर विवाहितेला मानसिक व शारिरिक छळ करण्यात आला. काय घडले नेमके?

असा घडला प्रकार

विवाह झाल्यानंतर एक वर्षापर्यंत सासरकडे सर्वकाही गुण्यागोविंद्याने सुरू होते. एक वर्षाने मुलगा झाल्यानंतर मुलाच्या जन्म प्रमाणपत्राकरिता पती प्रसाद खोडे यांना विवाह प्रमाणपत्र काढण्यास वेळोवेळी सांगितले. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. होंडाई शो रूममध्ये मॅनेजर पदावर काम करत असल्याचे त्यांनी खोटे सांगितले. याबाबत विचारणा केली असता, पती प्रसादने बेदम मारहाण केली. सासरच्यांनी पती-पत्नीत दुरावा निर्माण केला. पती प्रसाद, सासू उषा खोडे, सासरे दत्ता खोडे, राजश्री वरसाळे, विवेक खोडे, उषा खोडे यांनी वीणा खोडे यांचा शारीरिक, मानसिक छळ केला. तसेच शिवीगाळ करून घरातून हाकलून दिले.

हेही वाचा > विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना

सहा जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

उपनगर येथील विवाहितेचा छळ करून घरातून हाकलून दिल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरुद्ध उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. वीणा खोडे (राणाप्रताप चौक, सिडको) यांच्या फिर्यादिनुसार, २६ फेब्रुवारी २०१८ ला प्रसाद खोडे (रा. हरिवंश बंगलो, आराधना सोसायटी, खोडदेनगर, उपनगर) यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला.

हेही वाचा >  मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ