esakal | ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

animal ambulance 123.png

लॅम रोड येथून ‘ऍनिमल एम्ब्युलन्स’ गाडी जात असतानाच त्यात जे की होतं त्यावरून नागरिकांना कसला तरी भलताच संशय आला. त्यानंतर घटनेचा खुलासा होताच सर्वांनाच धक्का बसला. 

‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

sakal_logo
By
वाल्मिक शिरसाट

नाशिक / देवळाली कॅम्प : लॅम रोड येथून ‘ऍनिमल एम्ब्युलन्स’ गाडी जात असतानाच त्यात जे की होतं त्यावरून नागरिकांना कसला तरी भलताच संशय आला. त्यानंतर घटनेचा खुलासा होताच सर्वांनाच धक्का बसला. 

‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन

बुधवारी सायंकाळी सुमारास लॅम रोड येथून छोटा हत्ती (एमएच ४३, एफ ८३५६) या वाहनातून रामा निकम यांच्या मालकीचा घोडा व रस्त्यावरील मोकाट फिरणारा बैल घेऊन ही गाडी जात असतानाच कोणीतरी निकम यांना घोडा का विकला, कुठे विकला, अशी विचारणा केली असता संबंधित घोडा छोटा हत्तीत घेऊन चालल्याचे सांगितले. घोड्याचा शोध घेण्याच्या उद्देशाने निकम यांनी नाशिक रोडला धाव घेतली. रस्त्याने जात असतानाच निकम यांनी नागरिकांच्या मदतीने नाका नंबर सहा येथील शनिमंदिरासमोर छोटा हत्ती अडविला.लॅम रोडला छोटा हत्ती गाडीत बैलाला बेशुद्ध करून, तर घोड्याचे चारही पाय बांधून नेले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाकडे विचारणा केली असता विल्होळी येथील जनावरांच्या दवाखान्यात घेऊन चाललो, असे वाहनधारकासह गाडीतील तिघांनी सांगितले. परंतु तोपर्यंत बघ्यांची गर्दी झाली. याचदरम्यान खासदार हेमंत गोडसे यांनी माहिती मिळताच जनावरे चोरून घेऊन जाणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.

हेही वाचा > विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना

एका पोलिसांच्या ताब्यात, तर इतर दोघे फरारी

लॅम रोडला बुधवारी (ता. ३०) सायंकाळी जनावरे पकडून कत्तलखान्यात नेण्याचा प्रकार स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. ‘ऍनिमल एम्ब्युलन्स’ असे लिहिलेल्या गाडीतून जनावरे घेऊन चाललेली गाडी पकडण्यात आली. नागरिकांनी यातील एकाला पोलिसांच्या ताब्यात दिले, तर इतर दोघे फरारी झाले. घटनेची माहिती रामा निकम यांनी देवळाली पोलिस ठाण्याला दिली असता देवळाली कॅम्प पोलिसांनी वाहनचालकांसह वाहन ताब्यात घेतले असून, पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.  

हेही वाचा >  मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ

go to top