डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात टॉक्सी इंजेक्शनचा तुटवडा; सभापतींच्या पाहणीत प्रकार उघड

युनूस शेख
Thursday, 29 October 2020

टॉक्सी इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे श्री. बडोदे यांनी सांगितले. त्यांनी पीपीई किट परिधान करून वॉर्डात रुग्णांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट तयार केला जात आहे.

नाशिक : (जुने नाशिक) डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात टॉक्सी इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून आणावे लागत असल्याचा प्रकार मंगळवारी (ता. २७) उघड झाला. पूर्व प्रभाग सभापती ॲड. श्‍याम बडोदे यांनी रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयातील कामाचा आढावा घेताना त्यांना ही बाब निदर्शनास आली. 

नातेवाइकांची इंजेक्शनसाठी धावपळ

ॲड. बडोदे यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते, किरण शिंदे, तसेच परिचारिकाप्रमुख छाया शिंदे यांच्याकडून रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेतला. रुग्णालयाची सध्याची परिस्थिती जाणून घेतली. रुग्णालयात रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता १५० खाटांची आहे. ७३ रुग्ण दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ७७ खाटा रिक्त आहेत. २३ रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध आहे. स्वयंसेवी संस्थेमार्फत रुग्णांना जेवणाचा पुरवठा केला जात आहे. जेवणाचा दर्जा तपासणीसाठी त्यांनी स्वतः जेवण घेतले. टॉक्सी इंजेक्शनचा तुटवडा असून, नातेवाइकांना बाहेरील मेडिकलमधून ते आणावे लागत आहे. 

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत

पीपीई किट परिधान करून वॉर्डात रुग्णांशी चर्चा

कोविड सेंटर असल्याने रुग्णांचे नातेवाईक त्या ठिकाणी थांबत नाहीत. अशा वेळेस रुग्णास इंजेक्शनची गरज भासल्यास आणि ते वेळेवर उपलब्ध न झाल्यास रुग्णाच्या जिवाची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित करून त्यांनी उपाययोजना करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. टॉक्सी इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे श्री. बडोदे यांनी सांगितले. त्यांनी पीपीई किट परिधान करून वॉर्डात रुग्णांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट तयार केला जात आहे. त्याची पाहणीही त्यांनी केली. शेवटच्या टप्प्यातील काम सुरू असून, काही दिवसांत प्लांट सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Zakir Hussain at the hospital Unavailability of taxi injections nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: