वडील अंथरुणाला खिळलेले...मोलमजुरी करत विशालने बारावीत मिळवलं यश..वाचा फोटोमागच्या जिद्दीची कहाणी!

भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 July 2020

रोज सकाळी गाड्या धुण्याचे काम केले...स्वतःकडे कुठलेही वही, पुस्तक नाही...परीक्षेच्या एक तास आधी मित्रांच्या अपेक्षितमधून अभ्यास त्याने केला अभ्यास...अन् तरीही बारावीच्या परिक्षेत यश मिळविलेच...मोरवाडी येथील आव्हाड चाळ येथे राहणारा विशाल साळवे म्हणतोय...आयुष्य अनेक चांगल्या-वाईट घटनांचेच परीक्षेतले मार्क हे काही अख्खं आयुष्य तर नाही...एकदा वाचाच 

नाशिक : (मोरवाडी) रोज सकाळी गाड्या धुण्याचे काम केले...स्वतःकडे कुठलेही वही, पुस्तक नाही...परीक्षेच्या एक तास आधी मित्रांच्या अपेक्षितमधून अभ्यास त्याने केला अभ्यास...अन् तरीही बारावीच्या परिक्षेत यश मिळविलेच...मोरवाडी येथील आव्हाड चाळ येथे राहणारा विशाल साळवे म्हणतोय...आयुष्य अनेक चांगल्या-वाईट घटनांचेच परीक्षेतले मार्क हे काही अख्खं आयुष्य तर नाही...एकदा वाचाच 

परीक्षेच्या एक तास आधी केले वाचन...

घरची परिस्थिती बेताची...वडिलांना पॅरालिसिस असल्याने ते अंथरुणाला खिळलेले अशावेळी घराची संपूर्ण जबाबदारी दोघ भावांवर आली. विशाल रोज सकाळी गाड्या धुण्याचे काम करून कंपनीमध्ये नोकरी करत होता. मात्र महाविद्यालयात प्रवेश घेऊन देखील नियमितपणे महाविद्यालयात जाऊ शकत नव्हता. अकरावी झाल्यानंतर बारावीत प्रवेश घेतला खरा पण वह्या पुस्तके घेण्यास देखील पैसे नसल्याने संपूर्ण वर्षात एकदाही अभ्यास करता आला नसल्याची खंत आयुष्यभर खदखदत राहील. मात्र अंगी असलेल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर विशालने अंतिम परीक्षेच्या एक तास आधी मित्रांच्या अपेक्षित मधून अभ्यास करत पास झाला आहे. विशाल हा लहानपणा पासूनच हुशार मात्र परिस्थितीशी दोन हात करत त्याने कुठल्याहीक्षणी माघार न घेता लढण्याचे ठरवले होते. घर- खर्च व वडिलांच्या आजाराचा खर्च भागवण्यासाठी काम करणे हे अतिशय महत्वाचे असल्याने विशालने भविष्याचा विचार न करता वर्षभर कामे केली. यावेळी आठवड्यातून एकदा वेळ मिळेल तसा महाविद्यालयात जाऊन आठवडाभरात काय शिकवले याची चौकशी करत असे.

हेही वाचा > आयुक्तांची रात्री उशिरा रुग्णालयात एंट्री...चौकशीत मोठा खुलासा...नेमके काय घडले?

 ग्रामोदय महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील विद्यार्थी

विशाल सिडको येथील ग्रामोदय महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होता. विशालची परिस्थिती व हुशारी यामुळे शिक्षकदेखील त्याला मदत करत होते. या सर्व परिस्थितीचा सामना करत विशाल 295 गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. परीक्षेच्या अत्यंत शेवटच्या क्षणी अभ्यास करून काही विषयात 35 गुण मिळवून झाला आहे. एवढे कमी गुण मिळवून देखील विशालचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ऐनवेळी केलेल्या अभ्यासामुळेच पास झाल्याचे सांगितले. सध्या विशाल फर्निचर दुकानात काम करत आहे.

हेही वाचा > हायटेक सल्ला पडला महागात; दोन एकरांतील ऊस जळून खाक...नेमके काय घडले?

माझा आनंद त्या 35 गुण नसून पास होण्यात आहे. 35 गुण हे आयुष्य नाही ठरवू शकत तर मी कुठेही पास होण्याची ताकद माझ आयुष्य ठरवेल. हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश घेवून स्वतःची हॉटेल टाकायची आहे. - विशाल साळवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Overcoming the situation, Vishal Salve achieved his 12th success nashik marathi news