मालेगाव कोरोनामुक्ती पॅटर्नचा जिथे तिथे बोलबाला...बाहेरगावच्या रुग्णांचा आरोग्य यंत्रणेवर ताण!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

शहरातील कोरोनामुक्तीच्या पॅटर्नची चर्चा ऐकूण आता राज्यातील विविध जिल्ह्यांतील संशयित रुग्ण मालेगावी नातेवाइकांकडे व मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे महापालिका व आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण पडत आहे.

नाशिक / मालेगाव : शहरातील कोरोनामुक्तीच्या पॅटर्नची चर्चा ऐकून आता राज्यातील विविध जिल्ह्यांतील संशयित रुग्ण मालेगावी नातेवाइकांकडे व मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे महापालिका व आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण पडत आहे. 

यशस्वी मालेगाव पॅटर्नमुळे बाहेरगावच्या रुग्णांचा ताण 
जिल्ह्यात सुरवातीचा कालखंड वगळता मध्यतरीच्या काळात मालेगाव शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, मालेगाव महापालिका व पोलिस यंत्रणेने संपूर्ण क्षमतेने नियोजन व अंमलबजावणी करत संसर्ग रोखण्यात यश मिळवले. त्यामुळे मालेगाव पॅटर्नची सहाजिकच राज्यभर चर्चा झाली. परिणामी अन्य जिल्ह्यांतील रूग्णांचा ओघही आता येथे वाढत आहे. याचा ताण मात्र मनपा व आरोग्य यंत्रणेवर पडत आहे.

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

मनपा व आरोग्य यंत्रणेवर पडतोय ताण

येथील हज हॉल, मसगा महाविद्यालय-1, 2 व फरहान या चार ठिकाणी सध्या एकूण 102 ऍक्‍टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, येथील विविध कोविड केअर सेंटरमध्ये जळगाव, धुळे, भिवंडी, संगमनेर, मुंबई यांसह बाहेरगावातील 27 रुग्ण उपचार घेत आहेत. महापालिका प्रशासनाने या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे. दरम्यान, शहरातील फरहान हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या जुना आझादनगर भागातील 59 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा सोमवारी मृत्यू झाला. तसेच, मनमाड येथील 61 वर्षीय संशयिताचाही मृत्यू झाला. मात्र, त्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to successful Malegaon pattern Outpatient stress nashik marathi news