भयानक! कोरोना आला दाराशी...अन् मशिनच्या कॅलिब्रेशनचीच बोंबा बोंब!

swab2.jpg
swab2.jpg
Updated on

नाशिक : डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत कोरोना तपासणीला सुरवात झाली खरी, पण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे देण्यात आलेल्या मशिनच्या कॅलिब्रेशनची बोंब कायम आहे. दुसरीकडे रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर स्वॅबचा ताण प्रयोगशाळेवर टाकून यंत्रणा नामानिराळ्या होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

मुंबई-पुण्याला स्वॅब पाठविण्याची सूचना 

वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सोमवारी (ता. 4) प्रयोगशाळा चालविणाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली. त्या वेळी नाशिकमध्ये उपलब्ध सुविधा आणि प्रत्यक्षात तपासणीसाठी देण्यात येणाऱ्या स्वॅबचे सूत्र जुळत नसल्याचे लक्षात आल्यावर डॉ. लहाने यांनी नाशिकचे स्वॅब तपासणीसाठी कोण घेऊ शकेल, अशी विचारणा केली. त्यावर पुणे, मुंबई आणि औरंगाबादमधील प्रयोगशाळांनी प्रत्येकी शंभर स्वॅब तपासून देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार नाशिकमधील प्रलंबित स्वॅबचा निपटारा व्हावा म्हणून मुंबई, पुणे, औरंगाबादला स्वॅब पाठविण्याची सूचना डॉ. लहाने यांनी केली. यंत्रणांमधील अधिकाऱ्यांना त्यासंबंधीची माहिती देण्यासाठी महाविद्या लयातर्फे संपर्क साधण्यात आला. मात्र, संपर्क न झाल्याने एसएमएसद्वारे माहिती कळविण्यात आली. हा एसएमएस कसा आला आणि काय झाले, याची माहिती घेण्याऐवजी डॉ. पवार महाविद्यालयात तपासणी बंद करण्यात आल्याची चर्चा शहरभर पसरविण्यात आली. 

साडेतीनशे स्वॅब शिल्लक राहणार 

डॉ. पवार महाविद्यालय प्रयोगशाळेत गेल्या आठवडाभरामध्ये एक हजार 394 स्वॅब देण्यात आले आहेत. त्यांपैकी मंगळवारी (ता. 5) सकाळपर्यंत 858 स्वॅबची तपासणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर सकाळच्या सत्रात आणखी 94 स्वॅब तपासण्यात आले. रात्रीपर्यंत तपासलेल्या स्वॅबमध्ये 93 ची भर पडली. अशा तऱ्हेने एक हजार 45 स्वॅबची तपासणी झाली आहे. आणखी 349 स्वॅबची तपासणी करण्यासाठी दीड दिवसाचा कालावधी लागणार आहे. ही सारी परिस्थिती पाहिल्यावर आरोग्य विद्यापीठाच्या मशिनचे आठ दिवसांमध्ये कॅलिब्रेशन का झाले नाही? स्वॅबमधील स्राव शोषून तो मशिनमध्ये तपासणीसाठी देण्यासाठी लागणाऱ्या तीन तासांचा कालावधी कमी करण्यासाठी यंत्रसामग्री उपलब्ध करून का दिली नाही, असे विविध प्रश्‍न शिल्लक स्वॅबच्या अनुषंगाने तयार झाले आहेत. 

मिळालेले आणि तपासलेले स्वॅब 
तारीख तपासणीसाठी दिलेले स्वॅब तपासलेले स्वॅब 

28 एप्रिल 188 - 
29 एप्रिल 195 186 
30 एप्रिल 226 60 
1 मे 185 190 
2 मे 133 184 
3 मे 254 96 
4 मे 213 142 
5 मे - 187 
(दोनअंकी तपासणीवेळी किट्‌स बदल्यामुळे पद्धतीत बदल झाला.)  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com