....अन् नातवासाठी आजोबांनी झाकला बंगला! कारण...

संदीप मोगल : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

बाळ व आईच्या आरोग्याला घातक ठरेल, असे डॉक्‍टरांनी सांगताच तडाखे यांनी नातू भूषणसाठी आपला देखणा बंगला चक्क शेडनेटच्या सहाय्याने झाकूनच टाकला. यासाठी तब्बल अडीचशे फूट लांब व दहा फूट रुंद शेडनेटचा वापर केला. इतकेच नाही तर साचणारी धूळ साफ करण्यासाठी दररोज किमान दोन तास पिस्टन पंपाच्या सहाय्याने एक ते दीड हजार लिटर पाणी फवारले जात आहे.

नाशिक : पांडाणे येथील अशोक तडाखे यांनी आपल्या नवजात नातवाच्या आरोग्यासाठी आपला राहता बंगला चक्क शेडनेटच्या सहाय्याने झाकला असून, तो दररोज साफ करण्यासाठी एक हजार लिटर पाणी व किमान दोन तास लागत आहेत. अर्थात याला कारण आहे ते राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले कासवगतीचे काम. 

त्यांचा बंगला अगदी रस्त्यालगतच...म्हणून...

वणी-सापुतारा या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर सुरू असून, रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदून ठेवल्यामुळे नाशिककडून सापुतारामार्गे सुरतला जाणाऱ्या वाहनांचा मार्ग पांडाणे, बोरगावमार्गे केला आहे. या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून, गेल्या महिन्यापासून पांडाणे गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यावरच्या धुळीमुळे ग्रामस्थांना सर्दी, खोकला व श्‍वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. धुळीपासून बचावासाठी ग्रामस्थांनी आपल्या घरावर शेडनेट लावले आहे. 

तब्बल अडीचशे फूट लांब व दहा फूट रुंद शेडनेटचा वापर

पांडाणे गावातील अशोक तडाखे यांची सिन्नर येथील मुलगी पल्लवी बाळंतपणासाठी माहेरी आली असता घरात येणारी धूळ थांबविणे मोठे जिकिरीचे काम होऊन बसले होते. त्यांचा बंगला अगदी रस्त्यालगतच असल्याने घरात मोठी धूळ साचत होती. ही धूळ बाळ व आईच्या आरोग्याला घातक ठरेल, असे डॉक्‍टरांनी सांगताच तडाखे यांनी नातू भूषणसाठी आपला देखणा बंगला चक्क शेडनेटच्या सहाय्याने झाकूनच टाकला. यासाठी तब्बल अडीचशे फूट लांब व दहा फूट रुंद शेडनेटचा वापर केला. इतकेच नाही तर साचणारी धूळ साफ करण्यासाठी दररोज किमान दोन तास पिस्टन पंपाच्या सहाय्याने एक ते दीड हजार लिटर पाणी फवारले जात आहे. अर्थात दररोज होणारा हा त्रास नातू भूषणकडे पाहिल्यास निघून जातो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

हेही वाचा > नवविवाहितेला मुंबईत विकायचा डाव...नवरा अन् पहिल्या बायकोची काळी कृत्ये!

तत्काळ न झाल्यास सर्व ग्रामस्थ आंदोलन करू. 
घरात जेवणे तर सोडाच शौचालयात जाणेही अवघड झाले आहे. रस्त्यावरील ही धूळ रस्त्यापासून किमान अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत जात असल्याने संपूर्ण शेतीचे नुकसान झाले. अवघ्या पाच-दहा दिवसांचे हे काम गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू आहे. हे तत्काळ न झाल्यास सर्व ग्रामस्थ आंदोलन करू. 

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dust due to vani-saputara national highway work Nashik Marathi News