esakal | कोरोना काळात नाशिकमध्ये 'ई स्काय' व 'ई साय' क्लिनिकचे उदघाटन; आता चोवीस तास मिळेल तज्ञांचे मार्गदर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

e-cy clinic and e sky clinic inaugurated by chhagan bhujbal in nashik

जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बंगलोर येथील डॉ. ध्रुव जोशी व डॉ. रमण (व्हेंटिलेटर तज्ञ) यांच्या सहयोगाने ‘क्लाऊड फिजिशियन’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

कोरोना काळात नाशिकमध्ये 'ई स्काय' व 'ई साय' क्लिनिकचे उदघाटन; आता चोवीस तास मिळेल तज्ञांचे मार्गदर्शन

sakal_logo
By
अंबादास शिंदे

नाशिक रोड : कोरोना काळात नागरिकांची व रुग्णांची मानसिकता सकारात्मक राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या ‘ई साय क्लिनीक’ तसेच तंत्रज्ञान व तज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवा यांच्या समन्वयातून सुरु करण्यात आलेल्या ‘क्लाऊड फिजिशियन’ अशा दोन नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विभागीय महसुल आयुक्त कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. 

‘क्लाऊड फिजिशियन’ उपक्रम

जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बंगलोर येथील डॉ. ध्रुव जोशी व डॉ. रमण (व्हेंटिलेटर तज्ञ) यांच्या सहयोगाने ‘क्लाऊड फिजिशियन’ उपक्रम राबविण्यात येत आहे. बंगलोरमधील पथकाव्दारे जिल्हयात अतिदक्षता विभागात उच्च दर्जाचे कॅमेरे बसवून या कॅमेऱ्याव्दारे चोवीस तास रुग्णांवर बंगलोर येथील क्लाऊड फिजिशियन लक्ष ठेवणार असून त्यांना रुग्णांची स्क्रीनवर प्रत्यक्ष स्थिती बघून उपचारासाठी मार्गदर्शन करता येणार आहे.

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

आनंदी मन, सुदुढ शरीर उपक्रम

कोरोनाच्या संकटकाळामध्ये कोरोना रुग्ण तसेच आरोगय, पोलीस विभागातील कर्मचा-यांसह जिल्हयातील नागरिकांचे मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग व “ई साय क्लीनिक” यांचे संयुक्त विद्यमाने आनंदी मन, सुदुढ शरीर असा नाविन्यपूर्ण उपक्रम नाशिक जिल्हयात सुरु करण्यात आला आहे. आठवडयातील सातही दिवस चोवीस तास 7303250515 या निशुल्क क्रमांकावर मानसिक आजारांवर समुपदेशन करण्यात येणार आहे. बंगलोर स्थित ‘ACT’ या संस्थेने यासाठी आर्थिक सहाय्य केले आहे. 

PHOTOS : देश स्वातंत्र्य झाला.. पण आम्ही पारतंत्र्यातच? स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व दिनीच विहिरीत खाटेवर बसून आंदोलन

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सिमा हिरे, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निखिल सैंदाणे आदि उपस्थित होते.जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निखिल सैंदाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, डॉ. राहुल हडपे, जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण तज्ञ डॉ. निलेश जेजुरकर सदर प्रकल्प कार्यान्वित केला. 

संपादन - रोहित कणसे

go to top