तांदळावरील रोगनियंत्रण रणनीती; हैदराबादमध्ये डॉ. लावण्या करताहेत संशोधन

महेंद्र महाजन
Monday, 5 October 2020

ज्याचा उपयोग धानाची रोगप्रतिकारशक्ती सक्षम करणारी लस म्हणून करू शकतील आणि रोग जनुकांच्या संक्रमणापासून धानाच्या रोपांना प्रतिकार करण्याची शक्ती मिळेल. झँथोमोनास ऑरिझापी ऑरिझामुळे जगभरात तांदूळ उत्पादनाचे मोठे नुकसान होते. 

नाशिक : तांदळाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लवकर लस तयार होईल. डॉ. ताई लावण्या यांनी धानाशी संपर्क येऊन रोग निर्माण करणाऱ्या झू (झँथोमोनास ऑरिझापी ऑरिझा) या सूक्ष्मजंतूचा शोध लावला आहे. डॉ. ताई हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात सेंटर फॉर मोलेक्युलर बायोलॉजी विभागात कार्यरत आहेत. 

रोगप्रतिकारशक्ती सक्षम करणारी लस

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची डीएसटी-इन्स्पायर फॅकल्टी फेलोशिप डॉ. ताई यांना प्राप्त झाली आहे. त्या चमूसह धान पेशीभित्तिकांवर प्रभाव करणाऱ्या झू बॅक्टेरियम अथवा काही रेणू ओळखण्यासाठी आणि विकसित करण्यावर संशोधन करत आहेत. हा चमू नवीन रोगनियंत्रण रणनीती विकसित करत आहे. ज्याचा उपयोग धानाची रोगप्रतिकारशक्ती सक्षम करणारी लस म्हणून करू शकतील आणि रोग जनुकांच्या संक्रमणापासून धानाच्या रोपांना प्रतिकार करण्याची शक्ती मिळेल. झँथोमोनास ऑरिझापी ऑरिझामुळे जगभरात तांदूळ उत्पादनाचे मोठे नुकसान होते. 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

नवीन रोगनियंत्रण रणनीती 

डॉ. ताई यांच्या नेतृत्वाखालील चमूने ‘झू’ने स्राव केलेल्या वनस्पती पेशीभित्तिकेवरील निकृष्ट एन्झाइम्सवर बायोकेमिकल आणि फंक्शनल अभ्यास केला. ज्यातून झू रोगजनुकांच्या धान रोपाच्या संपर्कात येऊन रोगाशी संबंधित असलेल्या यंत्रणेविषयी माहिती मिळते. डॉ. ताई यांच्या मते, या अभ्यासामुळे तांदूळ संरक्षण प्रतिसादाचे नोवेल इलिसिटर्स उघडकीस आणेल. वनस्पती-रोगजनक परस्पर संवादाच्या मूलभूत बाबींबद्दल नवीन ज्ञान प्रदान करेल. ज्यामुळे किमान अर्धे जग अवलंबून असलेल्या पिकाचे नुकसान कमी होईल.  

हेही वाचा >  गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Efforts towards vaccination against rice diseases continue nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: