धक्कादायक! दिंडोरीत बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 25 मार्च 2020

जवळके दिंडोरी शिवारातील नवीन संचेती वेअर हाऊस मधील मारुती इंटेस्टीज कंपनीत दिंडोरी पोलिसांनी काल रात्री(ता.२५)  उशिरा छापा मारला असता तेथे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बेकायदा सॅनिटायझरचा सुमारे आठ लाखाचा साठा आढळून आला.

नाशिक / लखमापुर : दिंडोरी तालुक्यातील जवळके दिंडोरी शिवारातील एका वेअर हाऊस मधील कंपनीत अवैध व अप्रमाणित सॅनिटायझरचा सुमारे आठ लाखाचा साठा दिंडोरी पोलिसांनी जप्त करत कारवाई केली असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सुमारे आठ लाखाचा साठा जप्त

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जवळके दिंडोरी शिवारातील नवीन संचेती वेअर हाऊस मधील मारुती इंटेस्टीज कंपनीत दिंडोरी पोलिसांनी काल रात्री(ता.२५)  उशिरा छापा मारला असता तेथे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बेकायदा सॅनिटायझरचा सुमारे आठ लाखाचा साठा आढळून आला. त्यात पॅटसन सॅनिटायझरच्या 100 मिलीच्या सुमारे 5760 बाटल्या त्यात 3360 बाटल्यांवर बॅच उत्पादन तारीख एक्सपायरी तारीख किंमत असे काहीही आढळले नाही. तसेच 200 लिटरच्या दोन टाकीत सॅनिटायझर रसायन आढळून आले याबाबत दिंडोरीचे पुरवठा अधिकारी रवींद्र निरभुवणे यांनी फिर्याद दिली.  सदर बेकायदा सॅनिटायझर प्रकरणी अमित अलिम चंदांनी (रा नवीन सिडको) नाशिक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत 7 लाख 92 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे

हेही वाचा >"घरात कंटाळा येतोय.. विनाकारण घराबाहेर पडायचयं? तर घ्या मग पोलिसांतर्फे मोफत मसाजसेवा!"....सोशल मिडीयावर व्हायरल​

हेही वाचा > पोल्ट्री व्यवसायाला जिल्हा पोलिस अधीक्षक आरती सिंह यांचा दिलासा...लॉकडाऊनमध्येही मिळणार चिकन अन् अंडी!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eight lakh stocks of sanitizer seized in Dindori Nashik marathi news