जिल्ह्यात दिवसभरात आढळले एक हजार ४३६ कोरोनाबाधित; तर २० जणांचा मृत्‍यू

अरुण मलाणी
Thursday, 24 September 2020

दिवसभरातील मृतांमध्ये नाशिक शहरातील सात, नाशिक ग्रामीणमधील १३ रुग्‍णांचा समावेश आहे. यातून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ६७ हजार ६५३ झाली असून, बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ५७ हजार ९८८ झाली आहे. आतापर्यंत एक हजार २२५ रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. 

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (ता. २३) दिवसभरात एक हजार ४३६ नवीन कोरोनाबाधित आढळले, तर एक हजार ३९९ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. वीस रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. यामुळे ॲक्टिव्‍ह रुग्णसंख्येत सतराने वाढ झाली असून, सध्या जिल्ह्यात आठ हजार ४४० बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

दिवसभरात आढळले एक हजार ४३६ बाधित

नव्‍याने आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ७८६, नाशिक ग्रामीणचे ५८२, मालेगावचे ५५, तर जिल्‍हाबाह्य १३ रुग्‍णांचा समावेश आहे. बरे झालेल्‍यांमध्ये नाशिक शहरातील एक हजार २६, नाशिक ग्रामीणचे ३१३, मालेगावचे ५१ व जिल्‍हाबाह्य नऊ रुग्ण आहेत. दिवसभरातील मृतांमध्ये नाशिक शहरातील सात, नाशिक ग्रामीणमधील १३ रुग्‍णांचा समावेश आहे. यातून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ६७ हजार ६५३ झाली असून, बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ५७ हजार ९८८ झाली आहे. आतापर्यंत एक हजार २२५ रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. 

२० जणांचा मृत्‍यू 

दरम्‍यान, दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ५३६, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २१३, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २२, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १७, जिल्‍हा रुग्‍णालयात १९ संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ८७१ अहवाल प्रलंबित आहेत. यांपैकी एक हजार २२३ रुग्‍ण नाशिक ग्रामीणचे आहेत. 

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

तीन संशयितांचा मालेगावला मृत्यू 

मालेगाव : शहर व परिसरात बुधवारी नव्याने ५५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. महापालिकेच्या सहारा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असलेल्या तिघा संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच या संशयितांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शहरातील कॅम्प भागातील ६३ वर्षीय पुरुष, तसेच मनमाड येथील ७६ वर्षीय व निजामपूर (साक्री) येथील ५५ वर्षीय संशयित महिला अशा तिघांचा मृत्यू झाला. बुधवारी नव्याने २२ रुग्ण दाखल झाले. शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५९८ आहे.  

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight thousand 440 corona patients are undergoing treatment in the district nashik marathi news