esakal | जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir 123.jpg

कोरोना रुग्णांवरील उपचारात महत्त्वपूर्ण ठरलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची जिल्ह्यात पुन्हा टंचाई जाणवू लागली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढली असतानाच हे इंजेक्शन मिळेनासे झाल्याने त्याचा काळा बाजार व चढ्या दराने विक्री सुरू झाली आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

sakal_logo
By
प्रमोद सावंत

नाशिक / मालेगाव : कोरोना रुग्णांवरील उपचारात महत्त्वपूर्ण ठरलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची जिल्ह्यात पुन्हा टंचाई जाणवू लागली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढली असतानाच हे इंजेक्शन मिळेनासे झाल्याने त्याचा काळा बाजार व चढ्या दराने विक्री सुरू झाली आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोना उपचारासाठीचे रेमडेसिव्हिर व तत्सम इंजेक्शने, औषधे मुबलक प्रमाणात असल्याचा अन्न व औषध प्रशासनाचा दावा यामुळे फोल ठरला आहे. 

जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार 

जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी आवश्‍यक प्रमाणात या इंजेक्शनसह कोरोना उपचारासाठी लागणारी महत्त्वाची औषधे, इंजेक्शने उपलब्ध झाली होती. यानंतर अन्न व औषध विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी जिल्ह्यातील ४० औषध विक्रेत्यांकडे रेमडेसिव्हिर यासह अन्य औषधे उपलब्ध असून, त्यांची रास्त दराने विक्री करावी, असे पत्रक प्रसिद्धीला दिले होते. यानंतरच नेमकी रुग्णसंख्या वाढली. ही संधी साधून काही विक्रेत्यांनी कोरोनाबाधित मात्र रेमडेसिव्हिरची गरज नसलेल्या रुग्णांचे अहवाल गोळा करत या इंजेक्शनचा साठा करून ठेवला. यामुळे इंजेक्शनची टंचाई जाणवू लागली. 

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी,

अत्यवस्थ रुग्णाला आवश्‍यक असलेल्या या इंजेक्शनसाठी रुग्णाचे नातेवाईक विविध महानगर व गावे पालथी घालत आहेत. तरीही इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचा अनुभव अनेकांना आला. यातील काही रुग्णांच्या नातेवाइकांनी ‘सकाळ’ला दूरध्वनी करून आपबीती सांगितली. अन्न व औषध प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे. काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 


शहरातील एका खासगी रुग्णालयात माझ्या आईवर उपचार सुरू आहेत. आईसाठी आठ दिवसांपूर्वी या इंजेक्शनची गरज असल्याचे डॉक्टरांनी पहाटे अडीचला सांगितले. मी या इंजेक्शनची सर्वत्र शोधाशोध केली. पाच हजार ४०० रुपये एमआरपी असलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन मी दहा हजारांना घेतले. दोन इंजेक्शन आवश्‍यक असल्याने २० हजार रुपये अदा केले. कालपासून पुन्हा इंजेक्शनसाठी शोधाशोध करीत आहे. -सी. एम. निकम उपप्राचार्य मसगा महाविद्यालय, मालेगाव  
 

 संपादन -ज्योती देवरे

go to top