पात्र असूनही कर्जमाफीपासून वंचित; शेतकऱ्याची तक्रार 

प्रमोद सावंत
Saturday, 3 October 2020

आयडीबीआय बॅंकेच्या मालेगाव शाखेतून २०१६-१७ मध्ये कर्ज घेतले होते. कर्जमाफी योजनेस पात्र आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँकेने प्रकरण सादर केले होते. मात्र यादीत माझे नाव समाविष्ट केले नाही. बँकेत चौकशी केली असता, पहिल्या यादीत तुमचे नाव आले नसून आम्ही दुसऱ्या यादीत नाव पाठविल्याचे उत्तर दिले.

नाशिक / मालेगाव : महात्मा जोतिराव फुले कृषी कर्जमाफीतील अटी व शर्तीनुसार कर्जमाफीस पात्र असतानाही आयडीबीआय बँकेच्या हलगर्जीमुळे कर्जमाफी होऊ शकली नाही. या प्रकरणाची चौकशी करून कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी मागणी पिंपळगाव (ता. मालेगाव) येथील शेतकरी विलास भटू पवार यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

कर्जमाफीचा लाभ मिळण्याची मागणी 
आयडीबीआय बॅंकेच्या मालेगाव शाखेतून २०१६-१७ मध्ये कर्ज घेतले होते. कर्जमाफी योजनेस पात्र आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँकेने प्रकरण सादर केले होते. मात्र यादीत माझे नाव समाविष्ट केले नाही. बँकेत चौकशी केली असता, पहिल्या यादीत तुमचे नाव आले नसून आम्ही दुसऱ्या यादीत नाव पाठविल्याचे उत्तर दिले. या संदर्भात मागणी करूनही लेखी उत्तर दिले जात नाही. अल्पभूधारक शेतकरी असल्याने आर्थिक परिस्थिती अत्यंत सामान्य आहे. दोन वर्षांपासून ओल्या दुष्काळामुळे पीक आले नाही. त्यामुळे कर्जमाफीची अत्यंत गरज आहे. या संदर्भात न्याय मिळावा, टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडू नये, असेही श्री. पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.  

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eligible farmer debt waiver nashik marathi news