esakal | पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

highway.jpg

औरंगाबाद अहवा राज्य महामार्गावरील रस्त्यावर पोलिसांच्या नाकावर टिच्चून पहाटेच्या सुमारास अवैधरित्या वाहतूक होत असल्याची बाब रस्त्यावर जाॅगिंग करणा-या तरूणांच्या निदर्शनास आली आहे.

पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार

sakal_logo
By
दीपक खैरनार

अंबासन (जि.नाशिक) - औरंगाबाद अहवा राज्य महामार्गावरील रस्त्यावर पोलिसांच्या नाकावर टिच्चून पहाटेच्या सुमारास अवैधरित्या वाहतूक होत असल्याची बाब रस्त्यावर जाॅगिंग करणा-या तरूणांच्या निदर्शनास आली आहे.

नागरिकांच्या लक्षात आला प्रकार
सध्या तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यावर सायंकाळी व पहाटेच्या सुमारास नागरिक व्यायामासाठी बाहेर पडत आहेत. यात पहाटेच्या सुमारास अवैद्यरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पहाटेच्या सुमारास गुजरात राज्यातून जनावरे वाहतूक करणारी काही (गुजरात परवाने असलेली) पिकअप वाहणे भरधाव वेगाने मुल्हेर गावाकडून मालेगावच्या दिशेने धावत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याच दरम्यान अवैद्य लाकूड वाहतूक करणारे वाहनसुध्दा निदर्शनास येत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत काही तरूणांनी वडणेर खाकुर्डी पोलिसांना माहिती दिली असता त्यांनी तातडीने रस्त्यावर नाकाबंदी केली होती. मात्र सदर वाहने चोरमार्गाने पसार झाल्याचे सांगितले जाते. जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुजरात राज्यातून होणा-या अवैद्यरित्या वाहतूकीकडे पोलिसांनी लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे. संबधित तरूणांनी तातडीने पुढील पोलिस ठाण्यात कळविले असता सदर वाहने चोरमार्गाने पसार झाल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा > विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा


आम्ही नेहमीच अंतापुरकडे पहाटेच्या सुमारास जाॅगिंगला जातो त्यावेळी रस्त्यावर नेहमीच अवैद्यरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याकडे पोलिसांनी लक्ष घालावे - डाॅ. नितीन पवार, ताहराबाद

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा