esakal | माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

shivaji kekre.jpg

शिवाजी ह्याचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याचा सरळ शांत स्वभाव असल्याने खुनाचे कारण अद्याप समोर आले नाही. याबाबत विभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे यांनी घटनास्थळी भेट देत मार्गदर्शक सूचना पोलिसांना केल्या आहे.

माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

sakal_logo
By
गोपाळ शिंदे

घोटी (नाशिक) : आंबेवाडी (ता. इगतपुरी) येथे युवकाचा अज्ञातांकडून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (ता. १) रात्री साडेआठ वाजता सदर घटना उघडकीस आली. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नदीपलीकडे शिवाजी केकरे याचा मृतदेह आढळला
आंबेवाडी येथील माजी सरपंच सुरेश अमृता केकरे यांचा पुतण्या शिवाजी दशरथ केकरे ( वय २७ ) हा दुपारी बारा वाजता मळ्यातून गावात स्वस्त धान्य दुकानात रेशन घेण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत शिवाजी घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता नदीपलीकडे शिवाजी केकरे याचा मृतदेह आढळून आला. डोक्यात व तोंडावर कठीण वस्तूचा प्रहार करण्यात आल्याने जागीच मृत्यू झाल्याचे कुटुंबियांना समजताच घोटी पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. घटनेचे गांभीर्य पाहता सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होत, गावात शांतता प्रस्थापित कामी पोलिसांना सहकार्य करण्याचे अवाहन केले. मृत्यूदेह तातडीने घोटी ग्रामीण रुग्णालयात आण्यात आला असता, डॉक्टरांनी आधीच मयत झाले असल्याचे सांगितले.

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

लवकरच खुनाचा छडा लावणार

शिवाजी ह्याचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याचा सरळ शांत स्वभाव असल्याने खुनाचे कारण अद्याप समोर आले नाही. याबाबत विभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे यांनी घटनास्थळी भेट देत मार्गदर्शक सूचना पोलिसांना केल्या आहे. लवकरच खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश येईल असे त्यांनी सकाळ’शी बोलतांना सांगितले.  

>>> नाशिकच्या महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा