महावितरण सरळसेवा भरतीतील पात्र कनिष्ठ अभियंते आर्थिक संकटात.. पात्र उमेदवारांनी मांडल्या व्यथा... 

अंबादास शिंदे
Friday, 24 July 2020

महावितरण सरळसेवा अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदासाठी परीक्षेतून निवड झालेल्या पात्र उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पात्र उमेदवारांनी केली आहे. याबबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, पालकमंत्री छगन भुजबळ, स्थानिक खासदार व आमदारांना दिले. 

नाशिक रोड : महावितरण सरळसेवा अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदासाठी परीक्षेतून निवड झालेल्या पात्र उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पात्र उमेदवारांनी केली आहे. याबबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, पालकमंत्री छगन भुजबळ, स्थानिक खासदार व आमदारांना दिले. 

काय म्हणतात पात्र उमेदवार... 
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सरळसेवा भरती अंतर्गत १३ नोव्हेंबर २०१९ ला ३२७ जागांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेचा निकाल १७ जानेवारी २०२० ला लागला. निकालास अनुसरून उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया ४ फेब्रुवारीला पूर्ण झाली आहे. जाहिरात येऊन एक वर्ष होत आहे. परीक्षा होऊन सहा महिने उलटले तरी नियुक्ती देण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. लवकरच महावितरणमध्ये नियुक्ती मिळेल, या आशेने ऐन कोरोनासारख्या वैश्विक महामारीच्या काळात बऱ्याच उमेदवारांनी पूर्वीची नोकरीही सोडली आहे. त्यामुळे पात्र उमेदवार आर्थिक अडचणीत आले आहेत. 

पात्र उमेदवारांची त्वरित नियुक्ती करावी.

या भरतीसोबत महाराष्ट्र राज्यात बृहन्मुंबई महापालिका व मुंबई मेट्रो यांच्या जाहिराती प्रसिद्ध होऊन उमेदवारांना ऐन लॉकडाउन असतानाही नियुक्ती दिली आहे, तरीही महावितरण कंपनीनेही नियुक्तीसंदर्भात कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही. पात्र उमेदवारांची त्वरित नियुक्ती करावी. निवेदनावर सागर कदम, किरण थाटे, अमोल बोडके, रोशन टर्ले, अजय शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक! 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं...दुर्देवी घटना

पात्र उमेदवारांच्या व्यथा... 
महावितरणमध्ये रिक्त जागाची वारंवार चर्चा होत असते. कर्मचाऱ्यांवर वाढीव कामाचा सतत ताण असतो म्हणून महावितरण कंपनीने पात्र उमेदवारांची त्वरित नियुक्ती करीत कामाला गती द्यावी. - किरण थाटे 

महावितरण सरळसेवा भरतीमध्ये परीक्षा दिली, त्यात यश मिळाले. कागदपत्रांची पडताळणी होऊन सहा महिने झाले. मात्र आतापर्यंत नियुक्ती झाली नाही. नियुक्ती होईल, या अपेक्षेने पहिले काम सोडले. आज आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. - सागर कदम 

महावितरणच्या परीक्षा देऊन कागदपत्रांची पडताळणीही झाली आहे. महिनाभरात नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सहा महिने होत आले, तरी नियुक्तीपत्र नाही. - अमोल बोडके 

महावितरण सरळसेवा भरतीमध्ये परिरीक्षा दिली, त्यात यश मिळाले. कागदपत्रांची पडताळणी झाली. कंपनीकडून लवकरच नियुक्ती मिळेल, या आशेने बऱ्याच उमेदवारांनी अगोदरचे काम सोडून दिले. आज आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

हेही वाचा > निरक्षर आई- बापाची दिव्यांग लेक सुनिताने शेवटी करून दाखवलचं! पालकांचे आनंदाश्रु थांबेना...

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eligible junior engineers in MSEDCL direct recruitment are in financial crisis