जिल्ह्यात 'इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर' कार्यान्वित...19 अधिकाऱ्यांची टीम सक्रीय

जिल्हाधिकारी सूरज मांढरे.jpg
जिल्हाधिकारी सूरज मांढरे.jpg

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाविरुद्धची लढाई एका निर्णायक टप्प्यावर आलेली आहे. आपण सर्वच याची व्याप्ती कमीत कमी कशी करता येईल यावर भर देत आहोत. ही लढाई अजून किती दिवस चालेल याचा कुठलाही अंदाज नाही. त्यामुळे भविष्यातील बरेच दिवस अशा परिस्थितीचा सामना करावा लागेल, असे गृहीत धरून जिल्ह्यात "इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर' जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

जिल्ह्यातील 20 अधिकाऱ्यांच्या सेवा अधिग्रहीत

श्री. मांढरे म्हणाले, की एकीकडे आरोग्य विभागाचे सबलीकरण करत असतानांच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम फारसा होऊ नये, यासाठी हे 
"इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर' कार्यान्वित करत आहोत. या सेंटरमध्ये जिल्ह्यातील 20 अधिकाऱ्यांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. त्यातील प्रत्येकाला 
एक जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. जे उद्योगधंदे कलम 144 मधून वगळले गेले आहेत, जे जीवनावश्‍यक आहेत, ते सुरळीत सुरू राहतील. जसे भाजीपाला, किराणा,औषधे वेळवर मिळण्यासाठी तसेच दैनंदिन वित्तीय व्यवहार कमीत कमी बाधित होतील, यासाठी यातील प्रत्येक अधिकारी आपापली जबाबदारी पार पाडतील. 
कोविडच्या लढ्यात प्रत्येकाने सर्वप्रथम 144 च्या आदेशाचे पालन करायला हवे. कारण कुठलेही असो सार्वजनिक, धार्मिक, सामाजिक, आर्थिक प्रत्येकाने बंधने पाळायला हवीत. कारण ही केवळ कायदा व सुव्यवस्थेची संदर्भातील लढाई नाही, एखाद्या घटने पुरती मर्यादित लढाई नाही. तुमच्या-आमच्यापैकी प्रत्येकाला धोका पोचविणारी ही एक जागतिक आपत्ती आहे. तिचा आपण सामना करतो आहोत, त्यामुळे यात सर्वांनी स्वत:चे आणि एकमेकांचे संरक्षण करायला हवे. 

फौजदारी कारवाई सुद्धा करण्यास प्रशासन मागे बघणार नाही

144 च्या कलमातील बारकावे, पळवाटा शोधून अनुचित प्रकार करणे तसेच गर्दी करणे अशा प्रकारची चूक कोणीही करू नये. त्यामुळे कदाचित आपणास खूप मोठ्या परिणामांचा सामना करावा लागू शकतो व त्याची जबाबदारीही आपणा सर्वांवर निश्‍चित केलेली आहे. जिल्ह्यातल्या संकटसमयी प्रशासनास मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावत आहेत, अशा प्रकारच्या सामाजिक संस्थांचे समन्वयन 
व नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आम्ही अधिकाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देत आहोत. नागरिकांनी  आपल्या कामाच्या संदर्भात थेट त्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा अव्याहत सुरू ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे जे किराणा दुकानदार अथवा वैद्यकीय व्यावसायिक अथवा विक्रेते विनाकारण बंद ठेवून अथवा त्याच्या वेळा कमी करून नागरिकांना अडचणीत आणतील अशा लोकांविरुद्ध फौजदारी कारवाई सुद्धा करण्यास प्रशासन मागे बघणार नाही, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी या वेळी सांगितले. 

इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे "संकट सोबती'... 

अधिकारी------ संपर्क क्रमांक 
नीलेश सागर------9422227990 
कुमार आशीर्वाद---9871017596 
डॉ. अनंत पवार--- 9881733345 
भागवत डोईफोडे---9423785785 
अरविंद नर्सीकर-----9403689487 
अरविंद अंतुर्लीकर---9545573109 
प्रकाश थविल-------9420735855 
नितीन कापडणीस---- 9923014353 
देवीदास टेकाळे------9594552157 
वैशाली झनकर-------9595333222 
नितीन गवळी---------9422410557 
सतीश भामरे----------9423447112 
ज्योती कावरे---------9850089155 
संजीव पडवळ--------9422211941 
दुष्यंत भामरे---------9820245816 
चंद्रशेखर साळुंखे-----9921226448 
नीलेश श्रींगी----------9552529697 
गौतम बलसाने-------9822458130 
अरविंद चतुर्वेद-------9422284764 
राजेश साळवे--------9422770785  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com