भरचौकात राडा! बाटलीत पेट्रोल न दिल्याने तिघांकडून कर्मचार्‍याला मारहाण...वाचा काय घडले?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

दुपारी दोन वाजेची वेळ...पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दोघांकडून पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला आरेरावी करत जबर मारहाण. असं काय घडले की, रागाच्या भरात संशयितांनी केला धक्कादायक प्रकार. वाचा सविस्तर...

नाशिक : दुपारी दोन वाजेची वेळ...पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दोघांकडून पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला आरेरावी करत जबर मारहाण. असं काय घडले की, रागाच्या भरात संशयितांनी केला धक्कादायक प्रकार. वाचा सविस्तर...

अशी आहे घटना

गुरुवारी (ता. १७) दुपारी २ वाजेदरम्यान श्री. कुबेर फिवुल पेट्रोलपंप, त्र्यंबक नाका येथे धक्कादायक घटना घडली. शोधन कुमावत पेट्रोल पंपावर काम करत असतांना मोटारसायकल (एमएच १५-एच बी ९७६८) वरुन दोघेजण आले. पेट्रोलसाठी कुमावत यांनी गाडीची टाकी उघडण्यास सांगितले. यावर संशयित म्हणाला, 'आम्हाला बाटलीत पेट्रोल दे'. बाटलीत पेट्रोल देणं बंद असल्यामुळे मी देऊ शकत नाही असं कुमावत म्हणाले. यावर दोघे संशयित आरेरावी करु लागले. रागाच्या भरात त्यांनी कुमावत यांना मारहाण देखील केली. आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी दाखविली असता ते दोघे फरार झाले. मात्र पुन्हा दोघे संशयित आपल्या तिसऱ्या साथीदाराला घेऊन आले. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

कुमावत यांना जबर मारहाण

तिघांनी मिळून कुमावत यांना लोखंडी पाईप व हाताने मारहाण केली. घडल्या प्रकारानंतर जखमी कुमावत यांच्याकडील एक हजार रुपये गहाळ झाले आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोटारसायकल (एमएच १५-एच बी ९७६८) च्या चालकासह अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employee beaten for not giving petrol in bottle nashik marathi news