
नाशिक/अंदरसूल : नोकरीच्या वाटा बंद असल्या म्हणून काय झाले..काही तरी करायची धमक असली की आपोआप मार्ग सापडतो हे दाखवून दिले आहे अंदरसूल येथील एका माजी सैनिकांने...
रवींद्र वाघचौरे यांनी पोलिसाची नोकरी मिळाली नाही म्हणून खचून न जाता फौजी मोटर्स नावाने सुरू केलेल्या जुन्या वाहन खरेदी विक्रीसाठी चार जिल्हयातील शेतकरी ट्रॅक्टर खरेदीसाठी थेट अंदरसुलच्या बाजारपेठ येत असल्याने गावाची एक नवी ओळख निर्माण झाली असून क्रेज ही बनली आहे.
अंदरसुल येथील माजी सैनिक रवींद्र वाघचौरे भारतीय सैन्य दलातून 30 एप्रिल 2018ला सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलीस दलात नोकरी करण्याचा मानस आखल्याने त्या अनुषंगाने वाघचौरे यांनी येवला येथील नवचेतना अकॅडमीत पोलीस भरती होण्यासाठी सराव ही केला.परंतु महाराष्ट्र शासनाने दोन वर्ष पोलीस पदाची भरतीच केली नसल्याने वाघ चौरे यांचे पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याने खचून न जाता माजी सैनिक वाघचौरे यांनी भारतीय सैन्य दलात कार्यरत असतांना 'मॅकेनिकल कोर'मध्ये आपले चोख कर्तव्य बजावले आहे. या दरम्यानच्या काळात विविध वाहनांच्या रिपेरिंगचा अनुभव व सखोल माहिती वाघचौरे यांच्या पाठीशी असल्याने याच अनुभवाचे मुख्य भांडवल करीत वाघचौरे यांनी जुन्या वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्याचा संकल्प केला.
अंदरसुल गावाला एक नवीन ओळख
विशेष अनुभव आणि आत्मविश्वास तयार झाल्याने 27 नोव्हेंबर 2019 ला म्हणजेच दिवाळीच्या दरम्यान फौजी मीटर्स या नावाने जुन्या मोटार वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय माजी सैनिक वाघचौरे यांनी सुरू करून कुटुंबाचे पुन्हा एकदा आधारवड बनले ते आज पर्यंत केलेल्या यशस्वी खरेदी विक्रीच्या बळावर. मात्र यासाठी सुरुवातीला व्यवसाय सुरू करण्यासाठी वडील माजी सरपंच मारुती वाघचौरे,भाऊ महेंद्र आणि किशोर या दोन भावांनी आर्थिक भांडवलाच्या मदतीसह खंबीर साथ ही दिल्याने आज पर्यंत तब्बल 187 जुन्या वाहनांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार वाघचौरे यांनी केले असून त्यामध्ये 90 टक्के ट्रॅक्टरचे व्यवहार झाले असून इतर वाहनचे व्यवहार दहा टक्केच झाले आहेत.या निमित्ताने अंदरसुल गावाला एक नवीन ओळख निर्माण झाली असून कन्नड,
औरंगाबाद,नाशिक,अहमदनगर,जळगाव,सातारा,सांगली,पूना,सोलापूर,पंढरपूर मुंबई,ठाणे,कल्याण आदी शहरातील विविध तालुक्यातील शेतकरी खास जुन्या ट्रॅक्टरच्या खरेदसाठी येवला तालुक्यातील अंदरसुलला येत आहेत.
इतरही धंद्यांना चालणा
विशेष म्हणजे ट्रॅक्टरच्या खरेदी विक्रीसाठी चार जिल्ह्यातील शेतकरी गावात येत असल्याने अंदरसुल गावची लोकप्रियता ही वाढली आहे.लॉकडाऊनच्या काळातील चार-पाच महिने व्यवसायात खंड पडलेला असतांना आता ही खरेदी विक्रीचे व्यवहार जोरदार सुरू असून गावातील ट्रॅक्टर कारागीर रवींद्र शिंदे यांच्या ही हाताला रोजगार उपलब्ध झाला असून ट्रॅक्टर रिपेरिंगचे स्पेअरपार्ट ही येथील रामेश्वर हार्डवेअरमध्ये उपलब्ध होत असल्याने इतर ही बहुतांशी धंद्यांना चालना मिळून रोजगार उपलब्ध झाला आहे.
"सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलीस दलात जाण्याचा मानस होता.परंतु शासनाने दोन वर्षे नोकर भरती काढली नाही त्यामुळे दोन वर्षे वाया गेले.मात्र खचून न जाता अनुभवाच्या जोरावर वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला".
- रविंद वाघचौरे,माजी सैनिक,फौजी मोटर्स,अंदरसुल
"व्हाट्सउप ग्रुपच्या माध्यमातून अंदरसुलला चांगल्या प्रकारे ट्रॅक्टर मिळतात अशी माहिती ग्रुपवर मिळाल्याने थेट कन्नडहुन ट्रॅक्टर घेण्यासाठी अंडरसुलला येऊन मनासारख्या किंमतीत ट्रॅक्टर मिळाल्याचे समाधान वाटले."
-विनोद राठोड,शेतकरी ता.कन्नड (गाव शिवतांडा)
संपादन - रोहित कणसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.