
कोरोनाच्या काळात भाड्याने घरे देण्याचे प्रमाण तसे कमीच झाले आहे. अशातच आलेल्या परिस्थितीमुळे अनेकांना घरभाडे देणेही परवडत नसल्याने भाड्याने राहत असलेले भाडेकरूंना दर महिन्याला भाडे देणे तसे कठिण झाले आहे. कारण पगार हातात येत नसल्यामुळे परिस्थिती उद्भवत आहेत. अशातच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
नाशिक : कोरोनाच्या काळात भाड्याने घरे देण्याचे प्रमाण तसे कमीच झाले आहे. अशातच आलेल्या परिस्थितीमुळे अनेकांना घरभाडे देणेही परवडत नसल्याने भाड्याने राहत असलेले भाडेकरूंना दर महिन्याला भाडे देणे तसे कठिण झाले आहे. कारण पगार हातात येत नसल्यामुळे परिस्थिती उद्भवत आहेत. अशातच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
असा घडला प्रकार
लतेश उपाध्ये यांनी त्यांच्या शिवाजी चौक येथील घराच्या शेजारील खोली संशयित प्रेमचंद चौहान यास भाडेतत्त्वावर दिली होती. मंगळवारी रात्री संशयित त्याच्या मित्रांसह घरात आरडाओरड करत होता. उपाध्ये यांनी मज्जाव करून पाच महिन्यांचे थकलेले घरभाड्याची मागणी केली. त्याचा राग आल्याने संशयिताने चाकूने त्यांच्या मानेवर हल्ला केला. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने शेजारच्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तब्येत खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्का
खासगी रुग्णालयात उपचार सुरू
भाडेकरूने घरमालकास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार कथडा परिसरातील शिवाजी चौक भागात घडला. संशयित प्रेमचंद हरिराम चौहान यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार तेजश्री चंदणे यांचा मामेभाऊ लतेश उपाध्ये यांच्यावर मंगळवारी (ता. २५) रात्री अकराच्या सुमारास हल्ला झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले?