"हाऊज द जोश...हाई सर!" शत्रुला अनेकदा चितपट केले आता जरा कोरोनाला हरवू!"

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 4 May 2020

सीमेवरचे लढाई शत्रु बरोबर केल्या आहेत, आता डोळ्यास न दिसणाऱ्या या शत्रू बरोबर लढाई करत असताना पोलिसांबरोबर काम करून आणि एक प्रकारे देश सेवा करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पालिका, पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी हे माजी सैनिक देशसेवा म्हणुन विना मोबदला पार पाडणार आहेत.

नाशिक / मनमाड : शत्रुच्या विरोधातील लढाईनंतर आता देशाचे माजी सैनिक निवृत्तीनंतरदेखील कोरोनाविरुद्ध लढा देताना शहराच्या बंदोबस्तासाठी देशसेवा म्हणून 'कोरोना वॉरियर्स' च्या रुपात रस्त्यावर उतरले आहेत. देशसेवा म्हणुन विना मोबदला सेवा देत आहे. त्यामुळे पोलिसी खाक्याबरोबर आता सैनिकी शिस्तीची धडे दिसून येत आहे. 

'कोरोना वॉरियर्स' च्या रुपात रस्त्यावर उतरले हिंदुस्तानचे वाघ

कोरोनाचे भीषण संकट देशावर आले आहे. या संकटावर मात करण्यासाठी संपूर्ण देश लोकडाऊन करण्यात आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी मनमाड येथील माजी सैनिक कोरोनाच्या विरोधात या लढाईमध्ये आता 'कोरोना वॉरियर्स' च्या रुपात रस्त्यावर उतरले आहेत. पालिका, पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनच्या काळात पालिका, पोलिसांबरोबर खांद्याला खांदा लावून होमगार्ड, आरोग्यसेवक कार्यरत आहेत. माजी सैनिक कोरोना वॉरियर्सच्या रूपाने मैदानात उतरले आहे. या लढाईमध्ये ते शहरातील भाजीबाजार, मालेगाव चौफुली, महामार्गावर तैनात राहणार आहेत.

देशसेवा म्हणुन विना मोबदला सेवा

शहरात ३२ माजी सैनिकअसून, ते पालिकेसह  पोलिसांबरोबर बंदोबस्त करणे, नेमून दिलेल्या ठिकाणी तपासणी करणे, नागरिकांना मदत करणे आदी जबाबदारी पार पाडणार आहेत. सीमेवरचे लढाई शत्रु बरोबर केल्या आहेत, आता डोळ्यास न दिसणाऱ्या या शत्रू बरोबर लढाई करत असताना पोलिसांबरोबर काम करून आणि एक प्रकारे देश सेवा करत असल्याची भावना दादाजी आहिरे, मनोज काळे, श्रीकांत आहेर, जीवन रुपवते, भाऊसाहेब आहेर, अविनाश गरुड, सतिष पगारे, प्रवीण मोकळ यासह ३२ जणांनी व्यक्त केली. पालिका, पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी हे माजी सैनिक देशसेवा म्हणुन विना मोबदला पार पाडणार आहेत

हेही वाचा > कोरोनाची धडक थेट शेतकऱ्याच्या बांधावरच!...चांदवडला पुन्हा एक पॉझिटिव्ह

मनात देशभक्तीची भावना

देशाच्या संरक्षणासाठी काम करत होतो आता शहराच्या संरक्षणासाठी रक्षण करणे आमचे कर्तव्य असल्याने मनात देशभक्तीची भावना आहे शहर आमचा परिवार आहे त्यावर संकट आले आहे देशावर असो व शहरावर आम्ही मागे राहणार नाही पालिका, पोलीस पालिका प्रशासनाला मदत करतो- मनोज काळे, माजी सैनिक, मनमाड 

हेही वाचा > ओढणीचा झोका बेतला चिमुरड्याच्या जीवावर...मुलाची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा​

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex-servicemen become Corona Warriors nashik marathi news