यूपीएससीतर्फे उमेदवारांना मिळणार विमानप्रवासाचा खर्च..वाचा सविस्तर

Aeroplan
Aeroplan
Updated on

नाशिक : सध्याच्‍या कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्‍या परिस्‍थितीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या विविध परीक्षांचे वेळापत्रक प्रभावित झालेले आहे. त्यात नागरी सेवा परीक्षा २०१९ अंतर्गत काही उमेदवारांच्‍या वैयक्‍तिक मुलाखतीची प्रक्रिया प्रलंबित होती. ही प्रक्रिया २० ते ३० जुलै या काळात राबविण्यात येत असून, मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विमानप्रवासासाठीचे किमान भाडे अदा केले जाणार आहे.

यूपीएससीतर्फे उमेदवारांना विमानप्रवासाचा खर्च

केंद्रीय लोकसेवा आयोगाने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. दिल्‍लीला होणाऱ्या या मुलाखत प्रक्रियेसाठी उमेदवारांना विमानप्रवासाचा पर्याय सुचविलेला आहे. रेल्वेसेवा अंशत: बंद असल्‍याने उमेदवारांना फटका बसू नये, याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. वैयक्तिक (पीटी) मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना निवासाची सोय आणि वाहतुकीबाबतही मदत केली जाणार आहे. उमेदवारांना दोन्ही बाजूचा विमानप्रवासाचा खर्च दिला जाईल.

दिल्लीत ३० जुलैपर्यंत मुलाखत प्रक्रिया

त्‍यासाठी संबंधित राज्‍यांनी आवश्‍यक ती मदत करण्याच्‍या सूचनाही केल्‍या आहेत. लॉकडाउन जाहीर करण्यात आला तेव्‍हा, दोन हजार ३०४ उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू होती. लॉकडाउनमुळे ही प्रक्रिया स्थगित करावी लागली होती. यादरम्‍यान ६२३ उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया प्रलंबित आहे. आता ३० जुलैपर्यंत ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

उमेदवारांना मिळेल सहाय्यता
आयोगाने उमेदवारांना आवश्‍यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना आयोगाकडून मास्क, फेसशील्ड, सॅनिटायझर, ग्लोव्हज संच दिला जाईल. या संचाचा उमेदवारांनी मुलाखत प्रक्रियेत वापर करायचा आहे.

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com