हादरला परिसर.! मुंबई नाशिक महामार्गावरील स्वीट मार्टमध्ये अचानक स्फोट..

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

मुंबई नाशिक महामार्गावर गोंदे फाट्यावरील कजरे स्वीट मार्ट मधून पहाटे अचानक आग लागल्याचे काही नागरिकांनी पाहताच वाडी-र्हे पोलीस ठाण्यास कळविले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव  घटनास्थळी पोहचले. घटनेचे गांभीर्य पाहताच महिंद्रा,जिंदाल,महामार्ग अग्निशमन दलाच्या बंबास पाचारण केले. 

नाशिक / घोटी : मुंबई नाशिक महामार्गावर गोंदे फाट्यावरील कजरे स्वीट मार्ट मधून पहाटे अचानक आग लागल्याचे काही नागरिकांनी पाहताच वाडी-र्हे पोलीस ठाण्यास कळविले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव  घटनास्थळी पोहचले. घटनेचे गांभीर्य पाहताच महिंद्रा,जिंदाल,महामार्ग अग्निशमन दलाच्या बंबास पाचारण केले. 

आगीने घेतले रौद्ररूप
स्वीट मार्ट मधील दोन गॅस टाक्यांचा अचानक स्फोट झाल्याने परिसर हादरला. जवळच्या नागरी वस्तीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी पोलिसांनी हलविले. आगीचे रौद्ररूप कमी होतांना दिसत नव्हते,बाजूलाच पेट्रोल पंप व इतर व्यावसाहिक दुकाने असल्याने व दूरवरून आग दिसत असल्याने नागरिकांनी धाव घेतली. मुंबई नाशिक मार्गावरील वाहतूक काही काळ पोलिसांनी थांबवत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. शेजारील मोबाईल दुकानाचे पंचवीस हजाराचे नुकसान झाले. स्वीटमार्ट आतील तेलाचे पदार्थ,सुखा मेवा,स्वीटमाल,फर्निचर,टेबल खुर्च्यांसह नवीन भरलेला मालाचे अंदाजे सहा लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी महिंद्रा अग्निशमन दलाचे अधिकारी हरीश चौबे, वाडी-र्हे पोलीस ठाण्याचे हवालदार एन.एल.दहावाड, एन.एस देशमुख,बबन सोनवणे,के.यु.निंबाळकर यांनी अथक प्रयत्न घेतले.

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

दोन तासांच्या अथक प्रयत्नने आग आटोक्यात

गोंदे येथील कजरे स्वीट मार्ट दुकानास शनिवार ( ता. २० ) पहाटे पाच दरम्यान इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. महिंद्रा,जिंदाल,महामार्ग अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नने आग आटोक्यात आणली.

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण

परिस्थिती गंभीर

इलेक्ट्रिक शोर्ट सर्किटमुळे आग लागली,आत गॅस टाक्या किती याचा अंदाज नव्हता त्यात अचानकपणे टाकीचा स्पोट झाल्याने परिस्थिती गंभीर झाली होती,बाजूलाच पेट्रोल पंप व नागरी वस्तीसह व्यासाहिक दुकाने होती. अत्यंत गंभीर परिस्थितीत पोलीस कर्मचारी,अग्निशमन दलाचे अधिका-यांनी चोख कर्तव्य बजावले. – विश्वजित जाधव,पोलीस निरीक्षक वाडी-वर्हे.   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: explosion at Sweet Mart on Mumbai-Nashik Highway nashik marathi news