
यापूर्वी याच मालधक्क्यावरून ४, १७ व २१ डिसेंबर २०१९ या काळात मक्याचे तीन रॅक रुद्रपूर येथे रवाना करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल १३ महिन्यांनी पुन्हा रॅक रवाना झाला आहे. दरम्यान, बांगलादेशात मक्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळे येथील मालधक्क्यावरून तीन रॅकचे नियोजन दिवाळीपूर्वी करण्यात आले होते.
भुसावळ (नाशिक) : येथील रेल्वेच्या मालधक्क्यावरून बांगलादेशच्या दिशेने रॅक रवाना होण्यासाठीचे नियोजन पूर्वीपासूनच सुरू होते. मात्र अद्याप मक्याचा रॅक रवाना झाला नसला तरी कापसाच्या गठानींचा बीसीएन २१ वॅगन्सचा रॅक बांगलादेशाच्या सीमेवरील बनगाव येथे रवाना करण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तब्बल १३ महिन्यांनंतर पहिला रॅक रवाना झाल्याने हमालांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मालधक्क्यावरून बांगलादेशाच्या सीमेवर रॅक रवाना
अहमदाबाद येथील सीटीएल लॉजिस्टिक कंपनीतर्फे राज्यातील हिंगोली, अकोला, मलाकापूर, मुक्ताईनगर परिसरातील कापसाच्या गठाणी या रॅकमधून ५ जानेवारीला रवाना करण्यात आल्या. यापूर्वी याच मालधक्क्यावरून ४, १७ व २१ डिसेंबर २०१९ या काळात मक्याचे तीन रॅक रुद्रपूर येथे रवाना करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल १३ महिन्यांनी पुन्हा रॅक रवाना झाला आहे. दरम्यान, बांगलादेशात मक्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळे येथील मालधक्क्यावरून तीन रॅकचे नियोजन दिवाळीपूर्वी करण्यात आले होते. मात्र आवश्यक मका उपलब्ध न झाल्याने तो रॅक अद्यापही रवाना होऊ शकला नाही. तरी, बांगलादेशाच्या सीमेवरील बनगाव रेल्वे मालधक्क्यावर पहिला रॅक रवाना करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी व्यवसाय विकास समितीच्या माध्यमातून रॅक भरण्याचे नियोजन केले आहे.
हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार
हमालांना रोजगार
गेल्या १३ महिन्यांपासून येथील मालधक्क्यावरून एकही रॅक रवाना न झाल्याने मालधक्क्यावरील हमालांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान ५ जानेवारीला रवाना करण्यात आलेल्या रॅकमुळे या मालधक्क्यावर रेल ठेका मजदूर युनियनतर्फे शहरातील १०० व सावदा येथील १०० हमालांना रोजगार उपलब्ध करण्यात आला आहे. या मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी युनियनचे अध्यक्ष शेख सत्तार गवळी, उपाध्यक्ष इकबाल गवळी, सचिव बाबू गवळी, कालू गवळी हे प्रयत्न करीत आहेत.
हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप