कारखाना मालक-भाडेकरू भिडले...मालेगावात यंत्रमागावरून तंटा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 July 2020

परस्परविरोधी तक्रारी कटर मारल्याने हातावर जखम झाल्याची तक्रार आरीफ सलोटी यांनी दिली आहे. याउलट कारखान्याचे भाडे वेळेवर न दिल्याने संशयितांनी कुलूप लावले. कुलूप का लावले याची विचारणा करण्यास गेलो असता घडला प्रकार

नाशिक / मालेगाव : शहरातील मोती हायस्कूलजवळील मोहंमद आरीफ बशीर ऊर्फ आरीफ सलोटी (वय ५२, रा. रजापुरा) यांच्या मालकीचा यंत्रमाग कारखाना त्यांनी सलमान मोहंमद इस्लाम यांना भाडेतत्त्वावर दिला. भाडे वेळेवर दिले नाही म्हणून मालकाने कारखान्याला कुलूप लावल्याची कुरापत काढून सलमान, त्याचा जोडीदार मोहंमद सलमता व अन्य एक मित्र अशा तिघांनी आरीफ सलोटी व बिसरुन्निसा इस्लाम यांना मारहाण केली. 

सहा जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल
परस्परविरोधी तक्रारी कटर मारल्याने हातावर जखम झाल्याची तक्रार आरीफ सलोटी यांनी दिली आहे. याउलट कारखान्याचे भाडे वेळेवर न दिल्याने संशयितांनी कुलूप लावले. कुलूप का लावले याची विचारणा करण्यास गेलो असता, मालक आरीफ सलोटी, आसिफ मोहंमद आरीफ व मुदस्सीर अशा तिघांनी शिवीगाळ व लाकडी दांड्याने मारहाण केल्याची तक्रार भाडेकरू सलमान मोहंमद यांनी दिली आहे. पवारवाडी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील सहा जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. 

हेही बघा >VIDEO : कृषीमंत्री कोरोनाबाधितांसोबत तीन पावली नृत्यावर थिरकतात तेव्‍हा.. व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!

कारखान्यात चोरी 
शहरातील रमजानपुरा-खडकी रोड भागातील गोपाळसेठ यांच्या लूम कारखान्यासमोरील द्याने शिवारातील कारखान्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ४८ किलो वजनाचा आठ हजार रुपये किमतीचा कॉटन थैला चोरून नेला. यंत्रमाग कारखानदार अकील अहमद निसार अहमद (वय ३८) यांच्या तक्रारीवरून रमजानपुरा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही बघा > अरेच्चा! तर हे रहस्य आहे काय मालेगावमधून कोरोना संपुष्टात येण्याचं?...भन्नाट व्हिडिओ एकदा पाहाच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The factory owner-tenant clashed nashik malegaon marathi news