थरारक! अक्षरश: काळ समोर असूनही बचावला दुचाकीस्वार; देव तारी त्यास कोण मारी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

देव तारी त्यास कोण मारी..ही म्हण तंतोतंत जुळत असल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. कारण अक्षरश: काळ समोर असूनही एक दुचाकीस्वार बालबाल बचावला आहे. काय घडले नेमके?

नाशिक : देव तारी त्यास कोण मारी..ही म्हण तंतोतंत जुळत असल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. कारण अक्षरश: काळ समोर असूनही एक दुचाकीस्वार बालबाल बचावला आहे. काय घडले नेमके?

अक्षरश: काळ समोर असूनही दुचाकीस्वार बालबाल बचावला

रस्त्यावरुन दुचाकीने किरण सुरेश देवकर हा युवक जात होता. पंडीत कॉलनीच्या वळणावर असलेल्या रिक्षा थांब्यालगत गंगापुररोडवर बुचाचे मोठे झाड होते. सकाळी (ता.२२) साडेआठ वाजेच्या सुमारास अचानकपणे हे झाड उन्मळून खाली कोसळले. यावेळी सुदैवाने झाड हळुहळु रस्त्याच्या बाजूला कलत असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने किरणने त्वरित दुचाकीवरुन बाजूला उडी घेतली. याचवेळी झाड पूर्णपणे रस्त्यावर कोसळले. सुमारे २५ ते ३० फुट उंचीचा हा भला मोठा वृक्ष कोसळल्याने रावसाहेब थोरात सभागृहाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत त्याचे खोड पडलेलेले होते. यामुळे अशोकस्तंभ-गंगापुरनाका व गंगापूरनाका ते अशोकस्तंभपर्यंतची वाहतुक दुतर्फा खोळंबली होती.

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

परिसरात विविध चर्चांचे तर्कवितर्क

आजुबाजुच्या लोकांनी वेळीच धाव घेत जखमी झालेल्या युवकाला रुग्णालयात उपचारासाठी हलविले. यावेळी युवकाला झाडाचा मार लागला नाही, मात्र त्याने उडी घेतल्याने रस्त्यावर पडल्यामुळे मुका मार लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या कार्यकर्त्यांनी  घटनास्थळी धाव घेतली. पेट्रोल कटरच्या साहाय्याने झाडाचे खोड कापून झाडाखाली अडकलेली दुचाकी जवानांनी बाहेर काढली. तसेच सुमारे दीड तास दोन कटरच्या साहाय्याने या झाडाचे संपूर्ण खोड कापून रस्ता वाहतुकीसाठी खुला करुन दिला. वादळवारा नसतानाही अचानकपणे भला मोठा वृक्ष कसा कोसळला ? याविषयी परिसरात तर्कवितर्क लावले जात होते.

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा

दुचाकीस्वार बालबाल बचावला

गंगापुररोडवरील मॅरेथॉन चौकात पंडीत कॉलनीच्या वळणावर असलेले भले मोठे सुमारे २५ ते ३० फुट उंचीचे बुचाचे झाड गुरुवारी (दि.२१) सकाळी अचानकपणे उन्मळून पडले. यावेळी झाडाच्या मोठ्या खोडाखाली रस्त्यावरुन जाणारी दुचाकी दाबली गेली. दुचाकीस्वाराने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने तो बालबाल बचावला. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीसांसह अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fallen tree on two wheeler rescued nashik marathi news