ह्रदयद्रावक! कर्ज फेडण्याच्या विवंचनेत मुलापाठोपाठ पिताही गेला; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

रामदास कदम
Thursday, 26 November 2020

शेतकरी त्याचा उभा जन्म काबाडकष्ट करत घालवतो, मात्र सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष आणि निसर्गाची अवकृपा ही कायमच शेतकऱ्यांवर होत असते, अशाच सततच्या नापिकी अन् कर्जाचा विवंतनेत रात्री कदम हे त्यांच्या द्राक्षबागेते गेले, पण परतलेच नाहीत,  पत्नीने सकाळी शोधा शोध सुरू केली तर घरापासून काही अंतरावर ते शेतात झोपल़ेले आढळले मात्र तेव्हा वेळ निघून गेली होती..

दिंडोरी (नाशिक) : शेतकरी त्याचा उभा जन्म काबाडकष्ट करत घालवतो, मात्र सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष आणि निसर्गाची अवकृपा ही कायमच शेतकऱ्यांवर होत असते, अशाच सततच्या नापिकी अन् कर्जाचा विवंतनेत रात्री कदम हे त्यांच्या द्राक्षबागेते गेले, पण परतलेच नाहीत,  पत्नीने सकाळी शोधा शोध सुरू केली तर घरापासून काही अंतरावर ते शेतात झोपल़ेले आढळले मात्र तेव्हा वेळ निघून गेली होती..

सहाच महीन्यापुर्वीच कर्ता मुलगा गमावला

याविषयी सविस्तर माहिती अशी की, दिंगबर वामन कदम यांचा मुलगा बापू याने सहा महिन्यांपूर्वी (एप्रिल 2020) द्राक्ष बाग पाच रुपयांनी गेल्यामुळे याच द्राक्ष बागेत आत्महत्या केली होती, तेव्हापासून कदम हे विवंचनेत होते. तेव्हा पासून सध्या शेतात कुठल्याही प्रकारचे उत्पादन नसल्याने हातचा कर्ता मुलगा गेला आपला जगून काही उपयोग नाही असा विचार ते नेहमी करत होते. आपल्यावर को-हाटे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे साडेतीन लाख मध्यवर्ती बँक कर्ज घेतले आहे. ते फेडावयाचे कसे कर्ता मुलगा बापू गेल्यावर माफ झाले नाही.असा सतत विचार ते करत असत. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

मुलागा गेला त्या ठिकाणीच बापही

तीन मुलीचे लग्न यापुर्वीच केलेले आहे एक मुलगा दत्तात्रय लष्करी सेवेत गुजरात सरहद्दीवर आहे. तर जवळ असल्याने बापू याने सहा महिन्यांपूर्वी (एप्रिल 2020) द्राक्षबागेतच आत्महत्या केली होती. मंगळवारी (ता.24) रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून किटकनाशक न्युआन पावशेर बरोबर घेऊन मुलगा बापू याने ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्याच ठिकाणी गेले..आणि मंगळवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास न्युआन पिऊन घेतले

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

रात्री बारा वाजता निधन 

बुधवारी (ता.25) सकाळी शोधा शोध सुरू झाली पत्नी सुशिलाने सकाळी सात वाजता घरापासून काही अंतरावर शेतात झोपल़ेले आढळले. जवळच न्युआन किटकनाशक बाटली आढळून आल्याने तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून बुधवारीच सकाळी अकरा वाजता नाशिक ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे उपचार घेत असताना बुधवारी (ता.25) रात्री बारा वाजता निधन झाले. गुरुवारी(ता.26) सकाळी अकरा वाजता को-हाटे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer committed suicide at dindori nashik marathi news