शेतकऱ्याकडूनच सोन्यासारख्या पिकावर कुऱ्हाड; जेसीबीच्या सहाय्याने बुडासकट उपटली बाग 

juni shemli 1.jpg
juni shemli 1.jpg
Updated on

जुनी शेमळी (नाशिक) : कोरोनाच्या संसर्गजन्य साथीच्या विळख्यात सापडल्याने मोठ्या प्रमाणात खर्च करूनही खर्च वसूल होत नसल्याने नवी शेमळी (ता. बागलाण) येथील शेतकरी केदा वाघ यांनी दीड एकर क्षेत्रात लावलेल्या ॲपल बोराच्या बागेवर कुऱ्हाडीने घाव घालून जेसीबीच्या सहाय्याने बुडासकट बाग उपटून काढली. 

जेसीबीच्या सहाय्याने बुडासकट उपटली बाग 
वाघ यांनी पाच वर्षांपूर्वी दीड एकर क्षेत्रात ४०० ॲपल बोराची लागवड केली होती. एक झाड ३५ रुपये याप्रमाणे कोलकता येथून आणले होते. दीड एकर क्षेत्राला दर वर्षी त्यांनी साठ हजार रुपये खर्च केला. या वर्षी चांगले उत्पादन झाल्यानंतर त्यांनी ॲपल बोर बाजारात विक्रीसाठी ठेवले. मात्र किलोस दोन रुपये किलो भाव मिळाला. त्यामुळे वाघ यांनी संतापात दीड एकर क्षेत्रातील संपूर्ण बागेवर कुऱ्हाड चालविल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने बुडासकट झाडे उपटली. 


दीड एकर क्षेत्रात अॅपल बोर बाग करण्यासाठी दर वर्षी ६० हजार रुपये खर्च केला. दर वर्षी औषध फवारणी, मजुरी हा खर्च करूनदेखील तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात खर्च केला व तोटा सहन करावा लागला. एक रुपयादेखील खर्च वसूल झाला नाही. -केदा वाघ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com