गावी जात असल्याचे सांगून शेतात गेलेला शेतकरी परतलाच नाही..शोध घेतला तर धक्काच!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

पंडित भिका ठाकरे (वय 85) मंगळवारी (ता. 7) सकाळी साडेआठच्या सुमारास दुसऱ्या गावी नातेवाइकांकडे जात असल्याचे सांगून शेतात गेले. पण त्यानंतर ते परतलेच नाही. जेव्हा नातेवाईकांनी शोध घेतला तेव्हा त्यांना धक्काच बसला.

नाशिक / नामपूर : राहूड (ता. बागलाण) येथील वयोवृद्ध पंडित भिका ठाकरे (वय 85) मंगळवारी (ता. 7) सकाळी साडेआठच्या सुमारास दुसऱ्या गावी नातेवाइकांकडे जात असल्याचे सांगून शेतात गेले. पण त्यानंतर ते परतलेच नाही. जेव्हा नातेवाईकांनी शोध घेतला तेव्हा त्यांना धक्काच बसला.

असा घडला प्रकार

शेतकऱ्याने शेतीच्या वादातून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. पंडित भिका ठाकरे (वय 85) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत ठाकरे मंगळवारी (ता. 7) सकाळी साडेआठच्या सुमारास दुसऱ्या गावी नातेवाइकांकडे जात असल्याचे सांगून शेतात गेले. तेथेच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा शोध घेतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. ठाकरे यांच्या शेतीवर एकाने हक्क सांगितला. त्यावरून अनेक वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू आहे. या वादातूनच ठाकरे यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. नामपूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शाहबाद खान यांनी विच्छेदन केले. आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांच्या नातेवाइकांनी केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.  

हेही वाचा > नाशिकच्या "त्या' कोरोनाबाधित रुग्णाची हीच ती "ट्रॅव्हल्स हिस्ट्री"

हेही वाचा > हेही वाचा > होम क्वारंटाइन "आमदार' काही ऐकेना! केला "असा' कारनामा अन् पडले वादाच्या भोवऱ्यात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer Suicide at nampur nashik marathi news