esakal |  चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला! संतापलेल्या शेतकऱ्याने कोथिंबीरच्या जुड्या फेकल्या रस्त्याच्या कडेला
sakal

बोलून बातमी शोधा

kothimbir 123.jpg

मोठ्या काबाडकष्टाने पिकविलेले पीक, त्याला खतपाणी घालून शेतकऱ्याने मेहनतीने कोथींबीर फुलविली. आता सोन्यासारख्या पिकाला चांगला भाव मिळणार या आशेने शेतकऱ्याने कोथिंबीरच्या जुड्या बाजारात विकण्यासाठी आणल्या खऱ्या..पण तिथेच त्याचा मोठा भ्रमनिराश झाला...नेमके काय घडले वाचा.

 चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला! संतापलेल्या शेतकऱ्याने कोथिंबीरच्या जुड्या फेकल्या रस्त्याच्या कडेला

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : मोठ्या काबाडकष्टाने पिकविलेले पीक, त्याला खतपाणी घालून शेतकऱ्याने मेहनतीने कोथींबीर फुलविली. आता सोन्यासारख्या पिकाला चांगला भाव मिळणार या आशेने शेतकऱ्याने कोथिंबीरच्या जुड्या बाजारात विकण्यासाठी आणल्या खऱ्या..पण तिथेच त्याचा मोठा भ्रमनिराश झाला...नेमके काय घडले वाचा...

चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला! 

दुगाव (ता. चांदवड) येथील शेतकऱ्याने गुरुवारी (ता. १९) मनमाडमध्ये कोथिंबिरीच्या ६०० जुड्या विक्रीसाठी नेल्या होत्या. त्यास शंभर रुपयांचा भाव पुकारण्यात आला. शेतातून बाजारात विक्रीसाठी कोथिंबीर नेण्यासाठी डिझेलचे पैसे निघणार नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्याने जुड्या रस्त्याच्या कडेला फेकून देणे पसंत केले. कोथिंबिरीच्या लागवडीपासून ते बाजारात आणण्यापर्यंत दोन हजार रुपये खर्च झाले असताना मातीमोल मिळाल्याने शेतकऱ्याचा राग अनावर झाला होता. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान