खुद्द कृषिमंत्र्यांच्याच मतदारसंघातील शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ? काय घडले नेमके?

dada bhuse on uri malegaon.jpg
dada bhuse on uri malegaon.jpg

नाशिक / मालेगाव : शहर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून यूरिया विक्री सुरू होती. बाजार समितीशेजारील खाद्य गुदामातून शेतकऱ्यांनी तासनतास रांगा लावून यूरिया खरेदी केला. आजही यूरिया विक्री सुरू असल्याच्या समजुतीतून सकाळपासूनच गुदामाजवळ गर्दी झाली. मात्र, यानंतर शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला..खुद्द कृषिमंत्र्यांच्याच मतदारसंघातील शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ? काय घडले पुढे वाचा...

खुद्द कृषिमंत्र्यांच्याच मतदारसंघातील शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ?

बाजार समितीशेजारील खाद्य गुदामातून शेतकऱ्यांनी तासनतास रांगा लावून यूरिया खरेदी केला. आजही यूरिया विक्री सुरू असल्याच्या समजुतीतून सकाळपासूनच गुदामाजवळ गर्दी झाली. येथील खत शिल्लक नसल्याचा फलक पाहून खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने मंगळवारी (ता. २१) दुपारी अचानक कॅम्प रस्त्यावर देना बँकेसमोर रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. 

..अखेर आंदोलन मागे घेतले. 
आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार चंद्रजित राजपूत, उपअधीक्षक रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण, कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिगंबर पाटील, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. व्यवहारे यांनी आंदोलनकर्त्यांना यूरिया विक्री झाल्याची माहिती दिली. अवघा १८ टन ४०० गोणी यूरिया शिल्लक असून, तो विविध दुकानांतून वाटप करण्यात होणार असल्याचे सांगितले. मात्र, आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. अखेर यूरियाच्या शिल्लक गोणी वितरित करण्याचा निर्णय झाला. प्रत्येक शेतकऱ्याला एक गोणी याप्रमाणे यूरिया वाटप सुरू होताच आंदोलन मागे घेतले. 

आंदोलनकर्त्यांवर कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर अध्यक्ष दिनेश ठाकरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात सागर पाटील, नीलेश पाटील, शाहूबाई दळवी, सरूबाई खोमणे, अर्चना अहिरे, दिनेश पवार, रमेश हाळनोर, अतुल अहिरे, मुरलीधर सूर्यवंशी व शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनामुळे कॅम्प रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. दरम्यान, सायंकाळी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याबद्दल श्री. ठाकरे यांच्यासह आंदोलनकर्त्यांवर कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

गोंधळ व गैरसमज झाला.

अवघा १८ टन यूरिया शिल्लक होता. आज शेतकरी येणार नाहीत व नाममात्र यूरिया शिल्लक असल्याने विक्री बंद ठेवली होती. विकास महामंडळाचे अधिकारी येथे काहीसे विलंबाने पोचल्याने गोंधळ व गैरसमज झाला. त्यातून हे आंदोलन झाले. -दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com