esakal | शेतकऱ्यांच्या घोषणांनी दणाणला आग्रा महामार्ग; विमा कंपन्यांविरुद्ध संताप
sakal

बोलून बातमी शोधा

farmer on the road.jpeg

या नुकसानीबाबत पीक विमा कंपन्यांनी हात वर केले असून नुकसानभरपाई बाबत कोणतीही दखल घेतली जात नाहीविमा कंपन्यांचे अधिकारीही भेटत नाही की फोनही घेत नाही.विमा कंपन्यांच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी घोटी महामार्गावर शनिवार (ता. 14) धरणे आंदोलन केले.

शेतकऱ्यांच्या घोषणांनी दणाणला आग्रा महामार्ग; विमा कंपन्यांविरुद्ध संताप

sakal_logo
By
मंगेश शिंदे

काळूस्ते (नाशिक) : अवकाळी पावसामुळे भातशेती उध्वस्त झाली असतांना विमा कंपन्यांनी हात वर केल्याने संतप्‍त झालेल्या इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांच्या विरोधात भर दिवाळीच्या दिवशी महामार्गावर धऱणे धरीत निषेध नोंदविला. शनिवार (ता. 14) शेतकऱ्यांच्या घोषणांनी महामार्ग दणाणून गेला होता.

पीक विमा कंपन्यांच्या विरोधात घोषणाबाजी

इगतपुरी तालुक्यात पाच ते सहा दिवस झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तसेच भात शेतीच उध्वस्त झाली. या नुकसानीबाबत पीक विमा कंपन्यांनी हात वर केले असून नुकसानभरपाई बाबत कोणतीही दखल घेतली जात नाहीविमा कंपन्यांचे अधिकारीही भेटत नाही की फोनही घेत नाही.विमा कंपन्यांच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी घोटी महामार्गावर शनिवार (ता. 14) धरणे आंदोलन केले. बाजार समितीचे माजी सभापती पांडुरंग शिंदे, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, माजी सभापती संपतराव काळे यांच्या नेतृत्वाखाली घोटी - सिन्नर महामार्गावर संतप्त शेतकऱ्यांनी धरणे धरले. शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

तीव्र आंदोलनाचा इशारा

पीक विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व अवकाळीमुळे कापणीसाठी आलेली पिके उध्वस्त होऊन नुकसान झाले. पिकविमा कंपन्याच्या निषेधार्त आज महामार्गावर धरणे आंदोलन केले. आंदोलनात बाळासाहेब वालझाडे, माजी सभापती मधुकर कोकणे, तुकाराम वारघडे, पांडुरंग शेंडे, पंढरीनाथ लंगडे, दौलत दुभाषे,नामदेव भोर, गणेश घोटकर आदी सहभागी झाले होते. नायब तहसीलदार प्रवीण बोडाळे व सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

शेतकऱ्यांनी यंदा ॲकसा जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत ऑनलाईन प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत पीकविमा काढला. अवकाळी पावसाने नुकसान होऊनही पीकविमा कंपन्यांनी पाठ फिरवली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही विमा कंपन्या दखल घेत नसल्याने दिवाळीत शेतकऱ्यांचं दिवाळ निघालं आहे. - पांडूरंग शिंदे (माजी सभापती बाजार समिती)

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात