घरात बसलेल्या शेतकऱ्याला मृत्यू चाटून जातो तेव्हा...वाचा नेमके काय घडलं?

दिपक खैरनार
रविवार, 2 ऑगस्ट 2020

सायंकाळची वेळ...बाहेर धुवांधार पाऊस पडत होता. संपूर्ण कुटुंब घरात बसून गप्पा मारण्यात दंग होते. तेवढ्यात वीजेचा जोरदार आवाज झाला अन् काही कळायच्या आतच त्यांचा हाताला रक्ताची धारच लागली. असे काय घडले अचानक...थरारक घटना

नाशिक : अंबासन (बागलाण) सायंकाळची वेळ...बाहेर धुवांधार पाऊस पडत होता. संपूर्ण कुटुंब घरात बसून गप्पा मारण्यात दंग होते. तेवढ्यात वीजेचा जोरदार आवाज झाला अन् काही कळायच्या आतच त्यांचा हाताला रक्ताची धारच लागली. असे काय घडले अचानक...थरारक घटना

अशी घडली घटना

तालुक्यातील श्रीपुरवडे येथे रविवारी (ता. 2) सायंकाळी पाचच्या सुमारास वीजेच्या कडकडाटासह धुवांधार पावसाने हजेरी लावली. शिवारातील एका शेतक-याच्या घरात वीज चाटून गेल्याने गंभीर दुखापत झाली. केशव बारकू गांगुर्डे (वय ६५) असे जखमी झालेल्या शेतक-याचे नाव आहे. परिसरात राहणारे शेतकरी कुटुंबिय केशव बारकू गांगुर्डे हे आपल्या शेतातील घरात बसले असतांना अचानक काहीही न कळण्याच्या आधीच वीचेचा जोरदार आवाज झाला. यामुळे संपूर्ण घरच हादरून गेले होते. घरात बसलेले श्री. गांगुर्डे यांच्या हाताला वीज चाटून गेल्याने गंभीर दुखापत झाली. यामुळे संपूर्ण कुटुंबीय भीतीच्या सावटाखाली होते. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू

वीज कोसळल्याचे माहिती मिळाताच गावातील तरूण व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र सुर्यवंशी यांनी घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेले केशव गांगुर्डे यांना नामपुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नामपुर ग्रामीण रूग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. श्रीपुरवडे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी शेतपीक जमीनदोस्त झाली आहेत. तर टिंगरी रस्त्यावरील फर्ची पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद झाला आहे. 

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers injured in power outage at Sripurwade nashik marathi news