धक्कादायक! जनावरांचा हंबरण्याच्या आवाजाने समजला प्रकार; बघ्यांच्या अंगावर अक्षरश: काटाच

दिपक देशमुख
Sunday, 15 November 2020

पहाटेची वेळ...जनावरांचे शेणपाणी आवरण्यासाठी ते गेले. दावणीला बांधलेले जनावरांनी एकच हंबरडा फोडला होता. कुत्रेही भुंकत होते. काही अंतरावर जाताच पावलांचे ठसे दिसले. जरा संशय वाटल्याने ते हळूहळू पुढ् गेले. अन् नंतर जे दिसले ते अंगावर काटा आणणारे होते. वाचा काय घडले?

नाशिक : (अंबासन) पहाटेची वेळ...जनावरांचे शेणपाणी आवरण्यासाठी ते गेले. दावणीला बांधलेले जनावरांनी एकच हंबरडा फोडला होता. कुत्रेही भुंकत होते. काही अंतरावर जाताच पावलांचे ठसे दिसले. जरा संशय वाटल्याने ते हळूहळू पुढ् गेले. अन् नंतर जे दिसले ते अंगावर काटा आणणारे होते. वाचा काय घडले?

पहाटे समजली घटना...

एकीकडे दिवाळीची धुमधाम सुरू असतांनाच अगदी गावालगत असलेल्या शेतकरी रमेश दौलत कोर यांच्या मालकीच्या खळवाडीत पहाटेच्या सुमारास बिबट्या काटेरी झुडूपातून दबक्या पावलांनी अलगद शिरला. यामुळे खळवाडीत दावणीला बांधलेले जनावरांनी एकच हंबरडा फोडला होता. परिसरात बिबट्याची चाहूल लागताच कुत्रे भुंकत होती. पहाटेच्या सुमारास मुलगा भुषण कोर जणावरांचे शेणपाणी आवरण्यासाठी गेले. तेव्हा बैलगाडीच्या चाकाला बांधलेले म्हशीच्या पारडूवर बिबट्याने हल्ला चढवत फस्त केल्याचे दिसून आले. भुषणने आजूबाजूला असलेल्या नागरिकांना सतर्क केले.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

खळवाडीत बिबट्याचे ठसे मिळून आले. त्यामुळे परिसरात आणखीनच भीती पसरली आहे. ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी वनपाल बोरसे, रेणुका आहिरे व राजेंद्र साळुंखे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. परिसरात गेली अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार वाढल्याने शेतक-यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers terrified by leopard attack nashik marathi news