विमा कंपन्या नुकसानीची दखल घेईनात; ऐन दिवाळीत शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात 

मंगेश शिंदे
Thursday, 12 November 2020

विमा कंपन्यां विरोधात शेतकरी महामार्गावर धरणे आंदोलन करतील असा इशारा बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंग शिंदे यांनी दिला.

नाशिक/काळूस्ते : ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसाने २० ते २५ तारखे दरम्यान इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यात भात शेतीसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीची विमा कंपन्या दखल घेत नसल्याने ऐन दिवाळीत इगतपुरी तालुक्यातील शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

विमा कंपन्यां विरोधात शेतकरी महामार्गावर धरणे आंदोलन करतील असा इशारा बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंग शिंदे यांनी दिला.ऑक्टोबर अखेरपर्यंत ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाई बाबत दावा केला असेल त्यांना पात्र ठरवून विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी शिंदे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसह विमा कंपनी प्रशासनाकडे केली आहे. त्यात, भारतीय जनरल विमा कंपनीची यंत्रणाही विस्कळीत होऊन टोल फ्री क्रमांकावर संपर्क करूनही फोन लागत नव्हते. मोबाईल टॉवरही बंद पडल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या. विमा कंपनीकडून जनजागृतीही झाली नाही त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील पीक विमा धारक असंख्य शेतकरी आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. 
 

हेही वाचा >  भाजप नेत्याच्या वाढदिवसाचा भररस्त्यात जल्लोष! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers will agitate for compensation in igatpuri taluka nashik marathi news