मन हेलावणारी घटना! लेकाच्या मृत्यूनंतर आठ तासांतच पित्याने सोडला जीव; परिसर हळहळला

दीपक अहिरे
Friday, 15 January 2021

आयुष्यात चांगल्या वाईट घटना घडत असतात पण काही घटना एखाद्याचं अख्खं आयुष्यच बदलून टाकतात. प्रत्येकजण आपले कुटुंब सुखात राहावे म्हणुन जीवाचं रान करतो, पण नियीती कधी कधी इतकी क्रूर होते की, विचारायला नको.. पिंपळगावच्या घोडके कुटुंबावर नियतीने असाच घाला घताला. त्यांच्यासाठी गुरूवारची रात्र म्हणजे काळ रात्रच ठरली...

पिंपळगावं बसवंत (जि. नाशिक) : आयुष्यात चांगल्या वाईट घटना घडत असतात पण काही घटना एखाद्याचं अख्खं आयुष्यच बदलून टाकतात. प्रत्येकजण आपले कुटुंब सुखात राहावे म्हणुन जीवाचं रान करतो, पण नियीती कधी कधी इतकी क्रूर होते की, विचारायला नको.. पिंपळगावच्या घोडके कुटुंबावर नियतीने असाच घाला घताला. त्यांच्यासाठी गुरूवारची रात्र म्हणजे काळ रात्रच ठरली...

योगेश घोडके यांचे एकत्रीत कुटुंब आहे. लहान बंधु सिध्देश्‍वर उर्फ गणेश घोडके हा धार्मिक व विवाह सोहळ्यासाठी चित्ररथ देण्याचा तसेच फटक्याचा व्यवसाय करायचा. गेल्या महिन्या पासुन गणेशला एका आजाराने ग्रासले. त्याच्या शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण घटत होते. त्याच आजार बळावत असल्याने गेली आठ दिवसापासुन मुबंई येथे उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले. पण दुर्दैवाने आजार बळावल्याने गुरूवारी (ता.15) सायंकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान सिध्देश्‍वरने (वय 38 वर्षे) प्राण सोडले. त्याच्या निधनाने घोडके कुटुंबातील आई, भाऊ, पत्नी व मुले यांचे हुंदके आवरत नव्हते

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

दुखः येथेच संपले नाही..

सिध्देश्‍वरच्या निधनाची बातमी वडील सुर्यकांत घोडके यांना सकाळी कळविण्यात आली आणि सिध्देश्‍वरच्या निधनाने घोडके कुटुंबाचे डोळे अगोदर पाणावलेले असतांना अवघ्या दहा तासाच्या अंतराने दुसरा झटका बसला. अगोदर कर्करोगाशी गेली दोन वर्षापासुन ते लढत होते. तरूण मुलगा नियतीने हिरावल्याचे दुख वडील घोडके यांच्यासाठी पचविणे अशक्य झाले. त्या धक्क्यातच त्यांनी डोळे मिटले ते कायमचेच. घोडके कुटुंबावर काही तासाच्या अवधीत सलग दुसरा दुखद प्रसंग ओढावला.

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

अख्ख्या गावाचे डोळे पाणावले...

सुर्यकांत घोडके (वय 73 वर्षे) हे पिंपळगांव मर्चटस बॅकेचे माजी उपाध्यक्ष होते.घोडके कुटुंबावरील अनपेक्षीत दुखःद प्रसगांत नागरिक सांत्वण करण्यासाठी बेहेड रस्त्यावरील निवासस्थानी मोठी गर्दी केली. पण कोणत्या शब्दांत सांत्वन करावे, हे सुचत नसल्याने नागरिक निशब्द झाले. पिंपळगावं शहरात हळहळ व्यक्त झाली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father and son died within eight hours at pimpalgaoan nashik marathi news