esakal | "नवरी जाडी असून नवऱ्याला शोभत नाही" सासरच्यांचा छळ नवविवाहितेला असह्य..अखेर सासरच्यांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

new bride suicide.jpg

ती जाडी असून, तिच्या नवऱ्याला ती शोभत नाही. ती व्यवस्थित कामधंदा करीत नाही तसेच तिने माहेरून कानातील सोन्याचे झुबे व कुडके करून आणली नाहीत. शिवाय शेतात पाइपलाइनसाठी व रोटर घेण्यासाठी दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून त्रास दिला जात होता. अखेर नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

"नवरी जाडी असून नवऱ्याला शोभत नाही" सासरच्यांचा छळ नवविवाहितेला असह्य..अखेर सासरच्यांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / येवला : ती जाडी असून, तिच्या नवऱ्याला ती शोभत नाही. ती व्यवस्थित कामधंदा करीत नाही तसेच तिने माहेरून कानातील सोन्याचे झुबे व कुडके करून आणली नाहीत. शिवाय शेतात पाइपलाइनसाठी व रोटर घेण्यासाठी दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून त्रास दिला जात होता. अखेर नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल..

असा घडला प्रकार

दीड महिन्यापूर्वी नायगाव (ता. श्रीरामपूर) येथील पूजाचा विवाह अंगणगाव येथील संदीपबरोबर झाला होता. मात्र दीड महिन्यातच पूजाला सासरकडच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरवात केल्याने अखेर पूजाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या वेळी विवाहितेचे वडील बाळासाहेब भारसकळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की पूजाचा लग्नानंतर शारीरिक व मानसिक त्रास सुरू झाला होता. ती जाडी असून, तिच्या नवऱ्याला ती शोभत नाही. ती व्यवस्थित कामधंदा करीत नाही तसेच तिने माहेरून कानातील सोन्याचे झुबे व कुडके करून आणली नाहीत. शिवाय शेतात पाइपलाइनसाठी व रोटर घेण्यासाठी दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून त्रास दिला जात होता. या प्रकरणी मनमाड उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे तसेच पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.  

हेही वाचा > ज्या मालेगावला भाजपच्या खासदारांनी नावे ठेवली.. फडणवीसांनी मात्र केले कौतुक..!

विवाहितेच्या पतीसह सासरा, दीर यांना पोलिसांनी केली अटक

दीड महिन्यापूर्वी विवाह झालेल्या अंगणगाव (ता. येवला) येथील नवविवाहितेने सासरकडच्या मंडळींकडून सुरू झालेल्या जाचास कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. पूजा संदीप आठशेरे (वय 22) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, विवाहितेच्या पतीसह सासरा, दीर यांना पोलिसांनी अटक केली. 

हेही वाचा >  "जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!