esakal | अंडाभुर्जीच्या उधारीने घेतला पित्याचा जीव; मालेगावला अंगावर काटा आणणारी घटना
sakal

बोलून बातमी शोधा

anda bhurji 1.jpg

इरफान अहमद याने सय्यद अनिसकडून अंडाभुर्जी खाल्ली होती. अनिसने त्याचे पैसे मागितले होते. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर असे काही घडले जे अंगावर काटा आणणारे होते.

अंडाभुर्जीच्या उधारीने घेतला पित्याचा जीव; मालेगावला अंगावर काटा आणणारी घटना

sakal_logo
By
प्रमोद सावंत

नाशिक / मालेगाव : इरफान अहमद याने सय्यद अनिसकडून अंडाभुर्जी खाल्ली होती. अनिसने त्याचे पैसे मागितले होते. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर असे काही घडले जे अंगावर काटा आणणारे होते.

असा घडला प्रकार

सय्यद अनिस व इरफान अहमद सलाउद्दीन ऊर्फ पप्पू (२६, रा. गुलशने-ए-मलिक) यांच्यात दोन आठवड्यांपूर्वी उधारीच्या पैशावरून वाद झाले होते. इरफान अहमद याने सय्यद अनिसकडून अंडाभुर्जी खाल्ली होती. अनिसने त्याचे पैसे मागितले होते. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. रविवारी दुपारी सय्यद अनिस हे मुलगा रिजवान (१२), उमेरा (५) यांच्यासह बाजारात भाजी खरेदी करीत असताना पप्पू तेथे आला. मागील भांडणाची कुरापत काढून पप्पूने अनिसच्या डोक्यात पाठीमागून लाकडी दांडक्याने वार केले. तोंडावर मारूनही जबर दुखापत केली. दुपारी हा प्रकार घडल्यानंतर अनिसला अत्यवस्थ स्थितीत खासगी रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी आझादनगर पोलिस ठाण्यात इरफान ऊर्फ पप्पूविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश

अंडाभुर्जीच्या बिलाच्या वादातून मालेगावला मुलासमोरच पित्याचा खून 
अनिसवर उपचार सुरू असताना रविवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात खुनाचे कलम लावले. या घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक दशरथ पारेकर, सहाय्यक निरीक्षक आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयिताला आझादनगर पोलिसांनी तातडीने अटक केली. मृत अनिसचा भाऊ सय्यद एकबाल सय्यद इमाम (६७, रा. म्हाळदे शिवार) यांच्या तक्रारीवरून इरफान ऊर्फ पप्पूविरुद्ध खून व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला.  

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

पोलिसांनी संशयिताला केली अटक

शहरातील म्हाळदे शिवारातील अमेनिया मशिदीजवळ किरकोळ वादातून एकावर लाकडी दांडक्याने जबर वार करून त्याचा खून करण्यात आला. सय्यद अनिस सय्यद इमाम (वय ४५, रा. म्हाळदे शिवार) असे मृताचे नाव आहे. रविवारी (ता. १३) दुपारी मागील भांडणाच्या वादातून खुनाचा प्रकार घडला. आझादनगर पोलिसांनी संशयिताला अटक केली.