ह्रदयद्रावक! एक हतबल बाप; हातात लेकाचा फोटो आणि भेटीची आस

सतीश निकुंभ
Tuesday, 29 September 2020

लेकाची भेट लवकरच होईल या आशेने एक बाप पायाला भिंगरी लावल्यागत ठिकठिकाणी शहराच्या या टोकाोपासून ते त्या टोकापर्यंत फक्त फिरतोय..ते फक्त मुलाचा काही पत्ता लागेल या आशेने. म्हातारपणाची काठी म्हणून ज्या मुलाला वाढविले, शिकविले, आज तो मुलगा अशा परिस्थितील बापाच्या आधाराला नाही. अशा एक ना अनेक अगदी विचित्र विचित्र विचारांनी त्या बापाच्या मनात काहूर माजलाय.

नाशिक / सातपूर : लेकाची भेट लवकरच होईल या आशेने एक बाप पायाला भिंगरी लावल्यागत ठिकठिकाणी शहराच्या या टोकाोपासून ते त्या टोकापर्यंत फक्त फिरतोय..ते फक्त मुलाचा काही पत्ता लागेल या आशेने. म्हातारपणाची काठी म्हणून ज्या मुलाला वाढविले, शिकविले, आज तो मुलगा अशा परिस्थितील बापाच्या आधाराला नाही. अशा एक ना अनेक अगदी विचित्र विचित्र विचारांनी त्या बापाच्या मनात काहूर माजलाय. सगळं काही ठिक असेल आणि लवकरच माझा मुलगा माझ्या जवळ असेल अशी आशा मनात ठेवून एक बाप हातात तरुण मुलाचा फोटो घेऊन गल्लोगल्ली फिरतोय. 

माझ्या अमोलला कोणी पाहिले का?

सातपूर औद्योगिक वसाहतीमधील इप्कॉस कंपनीत अमोल बाबूराव पाटील (वय २५) बेपत्ता झाल्याप्रकरणी त्याच्या पालकांनी सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सातपूर-सिडको भागात चौकाचौकांत फिरून फोटो दाखवत मुलाचा शोध सुरू आहे. मुक्ताईनगर (जळगाव) येथील अमोल बाबूराव पाटील हा मुक्ताईनगर (जळगाव) येथील युवक बेपत्ता आहे. त्याचे वडील बाबूराव पाटील यांनी सातपूरला कंपनी गेटवर, तसेच तो राहात असलेल्या सिडको येथील ठिकाणी शोध घेऊनही अमोलचा तपास लागलेला नाही. माझा अमोल कसा असेल? कुठे असेल? तो ठिक असेल ना? अशी चिंता त्या वडिलांना लागली आहे. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

त्यानंतर तो परत कामावर आलेलाच नव्हता..

अमोल २९ जुलैला कामावरून सुटला, त्यानंतर तो परत कामावर आलेला नसल्याने बेपत्ता झालेल्या अमोलचा त्याच्या कुटुंबाकडून शोध सुरू आहे. सातपूर पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्‍यात आली असून, त्याच्या पालकांकडून मुलाचा फोटो दाखवत सातपूर, सिडको या कामगार लोकवस्तीत शोध सुरू आहे. मुलाच्या चौकशीची त्याच्या कुटुंबाने मागणी केली आहे.  

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father search his son satpur nashik marathi news