
कोव्हीड 19 मुळे देशभरात लॉकडाऊन जाहिर करण्यात आल्याने सर्वांच्याच रोजच्या जगण्यावर मर्यादा आल्या आहेत. या मर्यादा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त असल्या तरी त्यातून अनेक समस्या निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दोन महिन्यांपासून घरात बसून राहिल्याने मनोंरजनाच्या माध्यमातून दिवस घालविले तरी दुसरीकडे घरामध्ये राहून "डी' जीवनसत्वांची कमतरता भासण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात येतेय.
नाशिक : कोव्हीड 19 मुळे देशभरात लॉकडाऊन जाहिर करण्यात आल्याने सर्वांच्याच रोजच्या जगण्यावर मर्यादा आल्या आहेत. या मर्यादा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त असल्या तरी त्यातून अनेक समस्या निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दोन महिन्यांपासून घरात बसून राहिल्याने मनोंरजनाच्या माध्यमातून दिवस घालविले तरी दुसरीकडे घरामध्ये राहून "डी' जीवनसत्वांची कमतरता भासण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात येतेय
मनोरंजनाला देखील मर्यादा
गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊन मध्ये लहान मुलांना पालकांकडून काळजीपोटी घराबाहेर पाठविले जात नसल्याने एकीकडे कोरोनामुळे बालकांचे संरक्षण होत असले तरी दुसरीकडे घरामध्ये राहून "डी' जीवनसत्वांची कमतरता भासून हाडे ठिसूळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोव्हीड 19 मुळे देशभरात लॉकडाऊन जाहिर करण्यात आल्याने सर्वांच्याच रोजच्या जगण्यावर मर्यादा आल्या आहेत. या मर्यादा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त असल्या तरी त्यातून अनेक समस्या निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दोन महिन्यांपासून घरात बसून राहिल्याने मनोंरजनाच्या माध्यमातून दिवस घालविले परंतू आता मनोरंजनाला देखील मर्यादा आल्या आहेत.
बालकांमध्ये हाडे ठिसुळ होण्याची आणखी एक भिती
घरात टाईमपास करण्यासाठी मोबाईलचा अधिक वापर वाढल्याने मानेच्या हाडांचे त्रास व डोळ्यांचे विकार बळावण्याची दाट शक्यता आहे. घरात बसून राहिल्याने चिडचिडेपणा, मानसिक संतुलन ढासळण्याचे प्रकार अधिक घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मधुमेह व रक्तदाबाच्या रुग्णांना दररोज व्यायाम करणे आवशक्य आहे. परंतु लॉकडाऊन च्या काळात घराबाहेर पडता येत नसल्याने व्यायामावर मर्यादा आल्या आहेत. अधिक झोप काढल्याने स्थुलपणा, पाठीचे दुखणे या आजारांना निमंत्रणे मिळण्याची दाट शक्यता आहे. आता दोन महिन्यांच्या लॉकडाऊन मुळे बालकांमध्ये हाडे ठिसुळ होण्याची आणखी एक भिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या. त्याच काळात महापालिकेने क्रिडांगणे व उद्याने हि गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेतला. संचारबंदी लागु केल्याने सोसायट्यांमध्ये देखील मुलांच्या खेळण्यावर मर्यादा आल्या. गेल्या दोन महिन्यांपासून अनेक घरांमधील मुले घराबाहेर न पडल्याने हाडे मजबुतीसाठी लागणारे डी जीवनसत्व न मिळाल्याने हाडांच्या आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उन्हापासून "डी" जीवनसत्व प्राप्त होते. घरातचं म्हणजे सावलीत बसून राहिल्याने मुलांना डि जीवणसत्व कमी प्रमाणात मिळतं आहे.
हेही वाचा > संशोधकांना सुखद धक्का! काळाराम मंदिरासमोर खोदकामात 'हे' काय आढळले?
अस्थिरोग तज्ञ म्हणतात...
0 ते 15 वयोगटातील मुलांची वाढ होताना हाडे मजबुतीसाठी डि जीवणसत्वाची आवशक्यता असते. उन्हापासून ते जीवणसत्व मिळते त्यामुळे लॉकडाऊन असला तरी घरे, सोसायटीची गच्ची, पार्किंग, बाल्कनी मध्ये किमान अर्धातास उन घेतल्यास हाडांच्या ठिसूळपणाची भिती दुर होईल.- डॉ. प्रशांत पाटील, अस्थिविकार तज्ञ.
हेही वाचा > GOOD NEWS : येवला, दाभाडी, ओझरच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा! 'हा' तालुकाही कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर
दृष्टीपथात शहर
शहराची लोकसंख्या - सुमारे 20 लाख.
0 ते 5 वयोगटातील मुलांची संख्या- 75 हजार
6 ते 15 वयोगटातील मुलांची संख्या- अडिच लाख.