कृषिमंत्री म्हणताएत...'उत्पादन खर्चात बचतीसाठी खतांची मात्रा महत्त्वाची'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

श्री. भुसे यांनी मालेगाव उपविभागांतर्गत मालेगाव, सटाणा व नांदगाव तालुक्‍यात खरीप हंगामात मका व कापूस या पिकांसाठी समूह आधारित कृषी विस्तार कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मालेगाव तालुक्‍यात 14 गावांमध्ये तो राबविला जाईल. यंदा राज्यात सुमारे दोन लाख टन रासायनिक खते व 75 हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोच झाले.

नाशिक : (मालेगाव) शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी पिकाची तांत्रिक माहिती कृषी विभाग, विद्यापीठ, विज्ञान केंद्र यांच्याकडून प्राप्त करावी. मृद आरोग्यपत्रिकेचे महत्त्व लक्षात घेऊन त्याप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा पिकांना दिल्यास उत्पादन खर्चात बचत होईल. उत्पादन वाढेल व खऱ्या अर्थाने उत्पादकतावाढ वर्ष साजरे होईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी टेहेरे येथे शुक्रवारी (ता. 12) केले. 

बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोच

टेहेरे येथे समूह आधारित विस्तार कार्यक्रमांतर्गत मका बियाणे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सरपंच चंदना पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी अशोक पवार, मंडळ कृषी अधिकारी अशोक निरगुणे, जी. बी. शिंदे, बी. के. पाटील, शैलेंद्र वाघ, चंदू शेवाळे, चंद्रकांत शेवाळे, प्रभाकर शेवाळे आदी उपस्थित होते. श्री. भुसे यांनी मालेगाव उपविभागांतर्गत मालेगाव, सटाणा व नांदगाव तालुक्‍यात खरीप हंगामात मका व कापूस या पिकांसाठी समूह आधारित कृषी विस्तार कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मालेगाव तालुक्‍यात 14 गावांमध्ये तो राबविला जाईल. यंदा राज्यात सुमारे दोन लाख टन रासायनिक खते व 75 हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोच झाले. महिलांचे कृषी क्षेत्रातील योगदान लक्षात घेता, या वर्षी शेतकरी महिलांचा प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला.

VIDEO : "मालेगावचा द्वेष करणारे आज शहरात कसे?" भर पत्रकार परिषदेत महापौरांकडून खासदारांचा निषेध...नेमके काय घडले?

श्री. देवरे यांनी या कार्यक्रमात विविध कंपन्यांचा सहभाग घेऊन रास्त भावात कृषी निविष्ठांचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात येईल. तालुक्‍यात मका व कापूस या पिकांसाठी एक हजार 335 एकर क्षेत्रावर 14 प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. कंपन्यांकडून होलसेल दरात किंवा त्यांच्या सीएसआरमधून सवलतीच्या दरात निविष्ठांचा पुरवठा, तसेच पेरणीपासून काढणीपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्रामार्फत करण्यात येईल, असे सांगितले. 

पीककर्जासाठी बॅंकांना सूचना 

राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठा करण्याच्या सूचना बॅंकांना शासनाने दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा यंत्रणा योग्य ती खबरदारी घेत असल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.  

 हेही वाचा > PHOTOS : दुर्दैवी घटना! पोलीस अधिकारीच्या गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा..सुट्टीनिमित्त घरी जातानाच काळाचा घाला..पाहा
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fertilizer quantity important for saving in production cost : Dada Bhuse nashik marathi news