भाऊ..कशाला घालतोय पोलीसांशी वाद....राहा की घरात!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

शहरात संचारबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करू नये, यासाठी चौकाचौकांत कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिस आयुक्तालयातून कर्तव्य बजावण्यासाठी संदीप गोरे यांची अंबड पोलिस ठाणे हद्दीत नेमणूक करण्यात आली. संशयित गोसावी याने शनिवारी (ता. 4) सायंकाळी सातला पवननगर येथील भाजी मार्केटबाहेर कार पार्किंग केली असता...

नाशिक : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सध्या शहरात संचारबंदी लागू असतानाही, संशयित कारचालकाने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी वाद घालत शिवीगाळ केली. या प्रकरणी अंबड पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणि संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने संशयित कारचालकाची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. 

असा घडला प्रकार

चेतन निंबा गोसावी (वय 34, रा. तीर्थरूप बंगला, कालिका पार्क, उंटवाडी) असे संशयित कारचालकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई संदीप दिलीप गोरे (28) यांच्या फिर्यादीनुसार, शहरात संचारबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करू नये, यासाठी चौकाचौकांत कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिस आयुक्तालयातून कर्तव्य बजावण्यासाठी संदीप गोरे यांची अंबड पोलिस ठाणे हद्दीत नेमणूक करण्यात आली. संशयित गोसावी याने शनिवारी (ता. 4) सायंकाळी सातला पवननगर येथील भाजी मार्केटबाहेर कार पार्किंग केली असता, त्या कारणावरून पोलिसांशी वाद घातला. पोलिस शिपाई संदीप गोरे यांच्याशी त्याने बाचाबाची केली. पोलिस कर्तव्य बजावत असतानाही त्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक व संदीप गोरे यांच्या नावाने एकेरी भाषेत उल्लेख केला.  

हेही वाचा > CoronaFighters : "आधी लढा कोरोनाशी नंतरच लगिन!''...असा निर्धार 'त्यांचा' पक्का

हेही वाचा > photos : 'सरकार मायबाप या संकटातून बाहेर काढा!'...शेतक-यांची आर्त हाक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: filed case against dispute with the police due to lockdown nashik marathi news