esakal | वर्षापूर्तीचा जल्लोष एमआयएम आमदारांच्या चांगलचं अंगलट! दहा जणांविरोधात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

aimim logo.jpg

शहरातील चौकात कार्यकर्ते, समर्थक जमतात. आनंदात केक कापतात आणि मग आपल्या आमदारांच्या वर्षापूर्तीचा एकच जल्लोष सुरू होतो. पण हाच जल्लोष आमदारांच्या चांगलाच अंगलट आल्याचा प्रकार मालेगावमध्ये घडला. काय घडले नेमके?

वर्षापूर्तीचा जल्लोष एमआयएम आमदारांच्या चांगलचं अंगलट! दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील चौकात कार्यकर्ते, समर्थक जमतात. आनंदात केक कापतात आणि मग आपल्या आमदारांच्या निवडणुकीच्या विजयाच्या वर्षापूर्तीचा एकच जल्लोष सुरू होतो. पण हाच जल्लोष आमदारांच्या चांगलाच अंगलट आल्याचा प्रकार मालेगावमध्ये घडला. काय घडले नेमके?

जल्लोष एमआयएमच्या आमदारांच्या चांगलचं अंगलट

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणाऱ्या कार्यक्रमास बंदी आहे. पण शनिवारी (ता.२४)ऑक्टोबरला मालेगाव मध्यचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद यांनी शहरातील मुशावर चौकात आपल्या कार्यकर्ते व समर्थकांसह विधानसभा निवडणुकीच्या विजयाची वर्षपूर्ती केक कापून मोठ्या जल्लोषात साजरी केली. असे असतानाही मौलाना मुफ्ती व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या दरम्यान मास्क न लावणे, रहदारीला अडथळा निर्माण करणे व सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत

आमदारांसह दहा जणांविरोधात गुन्हा

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांना विधानसभा निवडणूक विजयाची वर्षपूर्ती निमित्ताने केलेला जल्लोष चांगलाच महागात पडला आहे. सार्वजनिक ठिकाणी जल्लोष केल्याप्रकरणी आमदार मौलाना मुफ्ती यांच्यासह दहा जणांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

.