क्रूर नियती! चार दिवसांनी 'त्या' मातेला दिसलं आपलं लेकरु...आणि एकच हंबरडा फोडला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

पाडुंरंगाचे कुंटुंबिय अन् नातेवाईक घटनास्थळीच ठाण मांडून होते. अन् अखेर चार दिवसांनी दिसला पाडुंरंग अन् तो ही अशा अवस्थेत... कुटुंबियांनी फोडला हंबरडा. ही ह्रदय हेलावणारी घटना आंबेवाडी (ता. इगतपुरी) येथे घडली.

नाशिक/घोटी : पाडुंरंगाचे कुंटुंबिय अन् नातेवाईक घटनास्थळीच ठाण मांडून होते. अन् अखेर चार दिवसांनी दिसला पाडुंरंग अन् तो ही अशा अवस्थेत... कुटुंबियांनी फोडला हंबरडा. ही ह्रदय हेलावणारी घटना आंबेवाडी (ता. इगतपुरी) येथे घडली.

असा आहे प्रकार

शनिवारी (ता. 16) देव्हंडी येथे असलेल्या धबधबा येथे पांडुरंग ठेवळे (वय 12 वर्ष) हे बालक पोहण्यासाठी गेले होते. मात्र धबधब्यात पाण्याच्या खोलीचा अंदाज त्यास न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला होता. या वेळी पांडुरंगच्या मृतदेहाचा स्थानिक पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून शोध घेण्यात आला मात्र त्यांना तीन दिवस शोधूनही मृतदेह मिळाला नाही. अखेर चौथ्या दिवशी घोटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांनी जीवनरक्षक राष्ट्रपतिपदक सन्मानित गोविंद तुपे, सोबत निवृत्त माजी नौदल अधिकारी हरीश चौबे यांना सांगितल्यानंतर गोविंद तुपे आणि हरीश चौबे यांनी घटनास्थळी येऊन त्यांनी डोंगरकपारीला नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या धबधब्यात मृतदेहाचा शोध घेतला. या वेळी पांडुरंगचे कुटुंबीय आणि नातेवाईक तीन दिवस घटनास्थळीच ठाण मांडून होते. 

अखेर मृतदेहच बाहेर 

अखेर दोन तास पाण्यात शोध घेतल्यानंतर तुपे व चौबे यांना पांडुरंगचा मृतदेह मिळून आला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अर्चना पागिरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अरुंधती राणे यांनी भेट दिली. मृत पांडुरंगचा मृतदेह पाण्याबाहेर आणताच नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, सहाय्यक उपनिरीक्षक भीमा गांगुर्डे, हवालदार संतोष दोंदे, लहू सानप, प्रकाश कासार यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

हेही वाचा > रात्री ड्युटीवरून महिला घरी जाताना..वाटेत तिघांनी अडविले..अन् मग....

ऑक्‍सिजनसाठी शोधाशोध 

सेवाभावी वृत्तीने आतापर्यंत एक हजार 767 मृतदेह पाण्यातून बाहेर काढणाऱ्या गोविंद तुपे यांना क्‍यूबा सेट मिळाला आहे. मात्र त्यामध्ये ऑक्‍सिजन भरण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नसतात किंवा लोकही त्यांना पैसे देत नाहीत. मंगळवारी मृतदेह पाण्याबाहेर काढण्याकरिता पोलिसांनी श्री. तुपे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ऑक्‍सिजन भरण्यासाठी नाशिकच्या सर्व ऑक्‍सिजन सेंटरला भेट दिली मात्र त्यांना ऑक्‍सिजन मिळाला नाही. अग्निशमन दलाच्या कार्यालयात जाऊनही तिथे फायदा झाला नाही. आपत्ती व्यवस्थापनावर लाखो रुपये खर्च केला जात असला तरी तकलादू आपत्ती व्यवस्थापनाचा कारभार पुन्हा या घटनेतून चव्हाट्यावर आला आहे. 

हेही वाचा > लॉकडाउनचा येवला बस आगाराला फटका; तब्बल 'इतक्या' कोटींचा तोटा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally, four days later, the child's body was pulled out of the water nashik marathi news